अहमदनगर –  पुणे येथील नाभिक समाजातील संजय महादेव सुर्वे (रा.दत्तवाडी) यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणार्‍या नगरसेवक आनंद रमेश रिठे यांना अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन नगर शहरातील श्री संत सेना प्रतिष्ठान, ओबीसी बारा बलुतेदार महासंघ आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास आहेर, महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, आणि नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष इंजि.बाळासाहेब भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांची भेट घेऊन या प्रश्‍नांवर चर्चा  करुन निवेदन दिले. सुर्वे यांच्या मृत्सूस कारणीभुत ठरणारे नगरसेवक रिठे यांच्या राजकीय दबावामुळे त्यांच्यावर कारवाईला विलंब होत असून, नाभिक समाजातील सुर्वे या सामान्य व्यक्तीची आत्महत्येकडे दुर्लक्ष होण्याची ही गंभीर बाब असल्याचे निर्देशनास आणले असता आरडीसी श्री.निचित यांनी हा प्रश्‍न महाराष्ट्र शासनाकडे सादर करुन संबंधितांवरील अन्यायाची माहिती दिली जाईल, असे आश्‍वासन दिले.

याप्रसंगी डॉ.नंदलाल हिरे, राजेश सटाणकर, अशोक औटी, श्रीपाद वाघमारे, शाम औटी, संदिप सोनवणे, संजय खोंडे, सुधीर आहेर, ज्ञानेश्‍वर निकम, जीवन सोन्नीस, सुनिल निकम, कैलास आहेर, राजेंद्र सोन्नीस, प्रशांत सैंदाणे, आबा हिरे, शंभु आहेर, प्रसाद सैंदाणे, प्रकाश वाघ, निलेश पवळे सहभागी झाले होते. तत्पूर्वी निवेदनाची प्रत मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांना मेलवर पाठविण्यात आली.यावेळीही समाज बांधव आणि ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.