अहमदनगर : नगर जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वातील संघटित टोळ्या जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटलांच्या रडारवर आहेत. शहरातील दुकानदारांना खंडणी मागून दहशत निर्माण करणार्‍या तोफखाना हद्दीतील आरोपी विजय पठारे सह 6 जणांच्या टोळीला मोक्का लावून पोलीस प्रशासन कार्यवाही करणार आहे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे.विजय राजु पठारे, वय 40 वर्षे, रा. सिध्दार्थ नगर, ता. जि. नगर  अजय राजु पठारे, वय 25 वर्षे, रा. सिध्दार्थ नगर, ता. जि. नगर, बंडु ऊर्फ सुरज साहेबराव साठे, वय 22 वर्षे, रा. सिध्दार्थ नगर, ता. जि. नगर, अनिकेत विजु कुचेकर, वय 22वर्षे, रा. सिध्दार्थ नगर, ता. जि. नगर, प्रशांत ऊर्फ मयुर राजु चावरे, वय 24 वर्षे, रा. सिध्दार्थ नगर, ता. जि. नगर, अक्षय गोविंद शिरसाठ, वय 23 वर्षे, रा. सिध्दार्थ नगर, ता. जि. नगर यांचा आरोपींमध्ये समावेश आहे या  आरोपीवर मोक्काची कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यामध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने धडक कारवाई मोहीम हाती घेतलेली आहे, येथील जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ज्या आरोपींवर अनेक गुन्हे दाखल आहेत व ज्या टोळ्या गुन्हे करत आहेत अशांचा अहवाल तयार करून संबंधित पोलिस ठाण्याला पुढील कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते, मागील आठवड्यामध्ये अशा प्रकारची एका टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती.त्यामध्ये 9 आरोपी चा समावेश होता. या वर्षभरामध्ये पाच टोळ्या वर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी पदभार घेतल्यानंतर मागील गुन्हेगारांचं छडा लावून व त्यांचे रेकॉर्ड तपासून तोफखाना हद्दीत सह जिल्हा भरा मध्ये विविध ठिकाणी गुन्हा करणारे आरोपी विजय पठारे व त्यांच्या साथीदारांची टोळी ही कार्यरत होती, त्यांच्यावर व साथीदार यांनी संघटीतपणे 04 गुन्हे केलेले असुन इतर 09 गुन्हे हे त्यांनी त्यांचे इतर साथीदारांचे मदतीने केलेले आहेत. तोफखाना पोलीस स्टेशन मधील दाखल गुन्हयातील निष्पन्न व अटक आरोपी यांनी हे गुन्हे स्वतःचे आर्थिक फायदयासाठी संघटितपणे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

मागील सन 2011 ते सन 2021 पर्यंत  स्वतःचे आर्थिक फायदयासाठी संघटितपने हे केले असल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात  मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्हेगारी खोलीवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मागील महिन्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी नाशिक विभाग कडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता तो प्रस्ताव काल मंजूर करण्यात आला आहे. वरील सहा आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सोळंके ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज मेढे,जपे, विकास खंडागळे , आदींच्या पथकाने ही कारवाई केली या टोळीविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3 (1) (11), 3(2) व 3(4) (मोक्का) अन्वये कारवाई मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांची मंजुरी मिळाल्याने सदर गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग जि. नगर हे करीत आहेत. गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारी टोळीविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. अशा प्रकारे नगर जिल्हातील गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारे टोळीविरुध्द देखील आगामी काळात मोक्का कायदया अन्वये कारवाई करणार असल्याचे संकेत  पोलीस अधीक्षक . मनोज पाटील यांनी दिले आहेत.

विजय पठारे यांच्या गुन्हेगारी टोळीवर नगर जिल्हयातील तोफखाना व कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घातक शस्त्रासह जबरी चोरी करणे, घातक शस्त्राचा वापर करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, अनाधिकाराणे घरात प्रवेश करणे, सरकारी कामात आडथळा आणने, गैरकायदयाची मंडळी जमवने, विनयभंग करणे, दुखापत करणे, हद्दपार आदेशाचा भंग करणे, गंभिर दुखापत करणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे इत्यादी प्रकारचे दखलपात्र स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत एकूण 12 गुन्हे दाखल असून यामध्ये तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे,  तर उर्वरित गुन्हे कोतवाली पोलिस ठाण्याच्या अखत्यारित आहे.