अहमदनगर.–कोरोनाच्या काळात वहेद्त कोविड सेंटर मध्ये ज्या समर्पित भावनेने डॉ.इस्लाम शेख यानी सेवा केली .तशीच सेवा भविष्यात या अक्सा क्लिनीक मधुन मिळेल.असे प्रतिपादन  आ.संग्राम जगताप यांनी केले .     

मुकुंदनगर येथील अक्सा क्लिनीक च्या उद्गघाटन प्रसंगी ते बोलत होते.कोरोनाकाळात प्रत्येकाने केलेल्या कार्याची समाजाने दखल घेतली आहे .त्यांची इतिहासात नोंद होईल.कोरोनाकाळात उल्लेखनीय कार्य करणारया डॉ.इस्लाम शेख वसीम शेख,सुफियान शेख ,नदिर शेख यांचा कोरोना योध्दा सन्मानाने गौरव  करण्यात आला.

या कार्यक्रमास नगरसेवक अजिक्य बोरकर .विकिशेट जगताप,नगरसेवक समद खान,पत्रकार वहाब सय्यद,वहदत ए इस्लामीचे मौलाना जुबेर ,माजी प्रा चार्य अ.कादिर सर ,निजाम अहमद शेख ,आझम शेख आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.     

या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या .या क्लिनीक मधुन उत्तम अद्यावत रुग्ण्सेवा वाजवी दरात देण्याचा आपला प्रयत्न राहिल .असा विश्वास डॉ.इस्लाम शेख यानी  व्यक्त केला.   कार्यक्रमाचे प्रस्ताविक अल्ताफ़ शेख यानी केले .सुत्रसंचालन सय्यद वहाब यानी केले तर वसीम सय्यद यानी आभार व्यक्त केले .