अहमदनगर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी मुक्तार अहमद उस्मान (मुन्ना चमडेवाला) यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने करण्यात आली. उत्तर महाराष्ट्राच्या दौर्यावर असलेले या विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब नगर शहरात आले असता, त्यांनी पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर हे नियुक्ती पत्र दिले.

पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ईषादभाई जहागिरदार, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यावेळी उपस्थित होते. मुन्ना चमडेवाला हे यापूर्वी या विभागाचे प्रदेश सरचिटणीस होते. उपाध्यक्षपद देऊन त्यांना दुसर्यांदा संधी आणि बढती मिळाली आहे. माजी उपनगराध्यक्ष उस्मानशेठ यांचा मित्र परिवार सर्व क्षेत्रात असून, या समुदायासाठी ही निवड समाधानाची बाब आहे.

राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांचे विश्वासू म्हणून ते ओळखले जात होते. तिच परंपरा पुढे नेत मुन्ना चमडेवाला यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास संपादन करत पक्षात कार्यरत आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री प्रा.एस.एम.आय.असीर सर यांचे ते जावई आहेत. समाजकारणाचा वारसा त्यांना या दोन्ही घरातून मिळाला आहे. 

आ.अरुणकाका जगताप यांचे मार्गदर्शन आणि आ.संग्रामभैय्या जगताप यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक समाजात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार, ध्येयधोरण समजावून देण्याचा प्रयत्न या पदाच्या माध्यमातून करु, असे मुन्ना चमडेवाला यांनी नियुक्ती पत्र स्वीकारतांना सांगितले. समाजात एकोपा करुन त्यांच्या विकासासाठी योगदान देण्याची परंपरा आपण पुढे नेऊ असे सांगून त्यांनी पक्षाच्या ऋणात कायम राहण्याची ग्वाही दिली.  या निवडीबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.