अहमदनगर – जिल्ह्यात बुलेट राजा नावाची नवीन ध्वनीप्रदुषण करणारी समाज विघातक गँग निर्माण झालेली आहे.अशा स्वरुपाच्या कर्णकर्कश
आवाजामुळे तसेच सायलन्सरमध्ये एका विशीष्ट प्रकारचा बदल करून.शहरात ढोलकी वगैरे नावाने प्रसीद्ध झालेले अत्यंत विघातक आणि ध्वनी प्रदुषणाची परिसिमा ओलांडणारे असे आहे.

या कर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरीक लहान मुले,ब्लड प्रेशरचे रुग्ण यांना अत्यंत विपरीत परिणाम होतो आणि आरोग्याला हानी पोहचते अशी अहमदनगर शहरात एक दोनशे नव्हे तर हजारोंच्या संख्येने बुलेटचा वावर आहे.तसेच या बुलेटचा कंपनी शोरुममध्ये जेव्हा ही बुलेट येते तेव्हा त्याचा जो ओरीजनल आवाज आहे तो अत्यंत कमी आणि ध्वनीप्रदुषण करणारा नाही. परंतू या बुलेट मध्ये काही विशीष्ट बदल करुन आवाज वाढविण्यात येते आणि या प्रकारचा सायलेन्सर बसविण्यामागे उद्देश हा एक प्रकारे शहरात आणि समाजात दादागिरी तसेच दहशत निर्माण करुन स्वतःचा गुंडगिरी यादीत विशेष स्थान असल्याचे दर्शविणे आणि या भयावह आवाज करणार्‍या बुलेट वरून शहरात मोठा आवाज करत अती जास्त वेगाने भरकटणे आणि जनसामान्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हे बुलेट राजा करण्याचा प्रयत्न करीत असतात.

दुसरी विशेषता म्हणजे या कर्णकर्कश आवाज करणारे बुलेट गाड्यांच्या नंबर प्लेट नसतात आणि त्यामुळे त्यांना पकडणे शक्य होत नाही आणि नंबर प्लेटवर जातीवाचक,भावना भडकविणारे तसेच विशेष गुंडांच्या छत्रछायेत वावर असणारे त्या त्या गुंडांचे नाव त्यांच्या या कर्णकर्कश आवाज करणार्‍या बुलेटवर टाकतात.

अशा प्रकाराकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे या गैरप्रकारांना आणखी खतपाणी मिळत आहे.तरी संबंधित प्रश्‍न पोलीस प्रशासनाने या प्रकाराविरुद्ध धड मोहिम राबवुन अशा मोडीफाईड सायलेन्सर विकणारे आणि ते बसवुन देणारे अशा सर्वांबरोबर या ध्वनीप्रदुषणाची बुलेट घेऊन शहरात फिरणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी नितीन थोरात यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे.

बुलेटच्या कर्णकर्कश सायलेन्सरवर पोलिसांनी रोड रोलर चालवला अकोला पोलिसांची कारवाई आणि व्हिडीओ साभार महाराष्ट्र टाइम्स

https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/police-run-road-roller-over-the-bullets-loud-silencer/videoshow/81703374.cms