मुंबई ।

राज्यातील न्यूज पोर्टल आणि युट्युब संपादक व पत्रकारांना एकत्रित करून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढा उभा करण्यासाठी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. या संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष राजा माने यांनी राज्य कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी तुळशीदास भोईटे (मुंबई) तर सचिवपदी नंदकुमार सुतार (पुणे), राष्ट्रीय समन्वयकपदी राजू वाघमारे (पुणे), सहसचिवपदी केतन महामुनी (पुणे) यांची निवड करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र या विभागाची जबाबदारी अहमदनगर येथील संपादक शिवाजी शिर्के यांच्याकडे देण्यात आलेली आहे.

संपादक शिवाजी शिर्के यांच्यासह विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख (नागपूर), मराठवाडा अध्यक्षपदी डॉ.रेखा शेळके (औरंगाबाद), कोकण अध्यक्षपदी सागर चव्हाण (सावंतवाडी) तर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी शिवाजी सुरवसे(सोलापूर) यांची निवड करण्यात आल्याची माहिती सचिव नंदकुमार सुतार यांनी दिली. त्यांनी म्हटले आहे की, डिजिटल मिडिया क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच घटकांचे हित जोपासणे आणि पत्रकारिता व सामाजिक मूल्यांचे जतन करत या क्षेत्राच्या गुणात्मक विकासासाठी स्थापन झालेल्या या संघटनेचे मार्गदर्शक सल्लागार म्हणून ज्येष्ठ संपादक व विचारवंत अरुण खोरे हे कार्यरत आहेत. संघटनेच्या राज्यातील काही पदाधिकाऱ्यांची घोषणा संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली.