भारतात रियलमी नारजो 30 सीरिजमध्ये Realme Narzo 30 4G आणि Realme Narzo 30 5G 24 जून रोजी लाँच करणार आहे. त्याचबरोबर कंपनी Realme Buds Q2 देखील लाँच करणार आहे. आज या डिवाइसेसच्या लाँचपूर्वी यांची किंमत ऑनलाईन झाली आहे.

Realme Narzo 30 सीरिजमधील स्मार्टफोन्सची किंमत

रियलमी टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, Realme Narzo 30 चा 4G मॉडेल 4 जीबी रॅमसह दोन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये लाँच केला जाईल. तर 5G मॉडेल 6 जीबी रॅमच्या एकाच व्हेरिएंटसह बाजारात येईल. 5जी मॉडेलच्या रिटेल बॉक्सवर MSRP 17,990 रुपये असेल, परंतु बाजारात याची किंमत कमी असू शकते, अशी माहिती रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. रियलमी नारजो 30 सीरिजमधील दोन्ही फोन्स Racing Blue आणि Racing Silver कलरमध्ये लाँच होतील.

Realme Narzo 30 5G च्या 6GB + 128GB मॉडेलची भारतातील किंमत 15,990 रुपये असू शकते. Realme Narzo 30 4G च्या छोट्या म्हणजे 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये तर 4GB + 128GB व्हेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Realme Buds Q2 ची किंमत 2,899 किंवा 2,999 रुपये असू शकते, अशी माहिती एका टिप्सटरने दिली आहे.

Realme Narzo 30 5G चे स्पेसिफिकेशन्स

आंतरराष्ट्रीय बाजारात रियलमी नारजो 30 5जी MediaTek Dimensity 700 चिपसेटसह लाँच केला गेला आहे. तसेच, फोनमध्ये 4 GB RAM सह 64 GB आणि 128 GB स्टोरेजचे पर्याय आहेत. या स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर चालतो.

Realme Narzo 30 5G स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तर, मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे.

Realme Narzo 30 4G चे स्पेसिफिकेशन्स

रियलमी नारजो 30 बद्दल बोलायचे झाले तर, हा फोन 6.5-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच केला गेला आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G 95 गेमिंग प्रोसेसर आणि 900 MHz Mali- G76 GPU आहे. तसेच, 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 30वॉट डार्ट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येणाऱ्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 MP B&W पोर्टेट कॅमेरा आणि 2 MP चा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तसेच, व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 16 MP चा सेल्फी शुटर देण्यात आला आहे.