
खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सलग नाशिक फाटा ते चांडोली या रत्स्याच्या सहा पदरीकरणाच्या कामाचा पठपुरावा करत.पुणे नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर मोशी ते चांडोली या भागातील 17 किमी लांबीच्या रस्ताच्या सहा पदरीकरणाच्या कामकाजाला लवकरच सुरुवात होणार आहे अशी माहिती समोर येत आहे.
चाकणच्या तळेगाव चौकातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे अशी माहिती शिरुर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिली आहे. तसेच रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह डॉ.अमोल कोल्हे यांनी रस्त्याची पाहणी केली. केंद्रीय मंञी भुपृष्ठ वाहतूक मंञी नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून डॉ.अमोल कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इंद्रायणी नदी (मोशी) ते चांडोली या १७/७०० कि. मी. लांबीच्या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाची निविदा प्रक्रिया पार पडली आहे.येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
नाशिक फाटा ते मोशी या पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील लांबीतील भूसंपादनाच्या प्रक्रियेला सतत विलंब होत असल्याने या रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या कामाचे दोन भाग करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पहिल्या टप्प्यात मोशी ते चांडोली दरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे चाकणच्या तळेगाव चौक व एमआयडीसी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात नाशिक फाटा ते मोशी या लांबीतील भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याबाबत निविदा काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी याबाबतची संपुर्ण माहिती दिली आहे.तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर,चाकण शहराध्यक्ष राम गोरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे,नगरसेवक विशाल नायकवाडी आदी उपस्थित होते.