कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे आणि रुग्णसंख्याही आटोक्यात येत आहे काही ठिकाणी अनलॉक झाले आहे तर काही ठिकाणी lockdown सुरू आहे आणि काही ठिकाणी निरबंध लागू आहे. आता एकीकडे अहमदनगर महानगर पालिकेतील आरोग्य अधिकारी अनिल बोरगे वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त गायलेले एक हसीना थी एक दिवाना था यावरून संपूर्ण महाराष्ट्रात गाजले आणि मनपा आयुक्तांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या प्रकरणाची आज पुन्हा आठवण करून देण्या मागे आज नवी दिल्ली येथील ड्युटीवर असलेले पोलीस ‘टुकूर टुकूर देखते हो क्या’ या बॉलिवूड गाण्यावर थिरकले आणि देशभर भरपूर वायरल झाले काहींनी कौतुक केले तर काहींनी टीकांचा वर्षाव केला.

पोलिसांना आपल्या सुट्ट्या रद्द करुन जनतेच्या रक्षणासाठी अधिक वेळ काम करावं लागत आहे. अशा त्रस्त वातावरणात चार विरंगुळ्याचे क्षण म्हणून एका पोलीस जोडप्यानं बॉलिवूड गाण्यांवर डान्स करण्यास सुरुवात केली. त्यांचे हे रोमँटिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.हे पोलीस जोडपं दिल्लीतील आहे.

त्यांनी लॉकडाउन ड्युटिवर असतानाच पोलिसांच्या गणवेशात बॉलिवूड गाण्यांवर डान्स केला. हे व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर देखील शेअर केले. हे व्हिडीओ पाहून काही जणांनी त्यांचं कौतुक केलं. मात्र काहींनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. या व्हिडीओची नोंद आता दिल्ली पोलीस प्रशासनानं देखील घेतली आहे.

डीसीपी उषा रंगनानी यांनी त्यांना अधिकृत नोटिस बजावलं आहे. ऑनड्युटीवर असताना असे व्हिडीओ शूट करण्यामागणं कारण त्यांना यामध्ये विचारलं गेलं आहे. शिवाय त्यांना सस्पेंड देखील करण्यात आलं आहे.

डॉ बोरगे यांचे व्हिडीओ तर आपण सर्वांनी पाहिलेच आता या पोलीसांचे व्हिडीओ पाहूया