अहमदनगर : बॉलीवूड आणि करमणूक हे जसे एकमेकांशी संलग्न अशा गोष्टी आहेत तसेच या करमणूक कारखान्यात काम करणारे म्हणजेच बॉलीवूड स्टार हे कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमी वादात सापडतात आणि काही स्टार्स तर सदैव चर्चेत रहावे म्हणून काही ना काही वाद उभे करतात आणि चर्चेत येतात या विषयाला त्यांचा स्टारडम आणि त्यांना चर्चेत राहावे लागते तरच त्यांना काम मिळते आणि जास्त काम मिळते आणि जास्त मानधनही मिळते असे असेल तर त्यांच्या हिताचे असेलही असो याच्या खोलात आपल्याला न जाता हा विषय त्यांच्या दृष्टीने समजण्याजोगा आहे परंतु हेच जर पडद्या वरचा विषय न राहता आणि फक्त करमणुकीसाठी आणि चर्चेत राहण्यासाठी न होता नेहमीच वादात राहणाऱ्या अशा व्यक्तीला काय म्हणायचे आणि तेही अहमदनगर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी पद भूषविणारे सध्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेली व्यक्ती म्हणजेच कोण तर डॉ अनिल बोरगे हे काही आज वाढदिवसानिमित्त आणि त्यांनी गायलेल्या गाण्यामुळे चर्चेत आले असे नाही हा विषय फक्त या गाण्या पुरता नव्हताच कोरोना काळातील अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या डॉ बोरगेकडे होत्या आणि त्या जबाबदाऱ्या मध्ये कसूर केल्याचे अनेक प्रकरणात आढळते त्यांनी गायलेले गाणे हे एकावेळेस विरंगुळ्यासाठी असेलही आणि यात कोणाला आपुलकीही वाटत असेल आणि त्यांचे मित्र म्हणून त्यांच्या पाठीशी काही लोक उभे राहत जरी असतील तरी याचा अर्थ असा नाही कि अहमदनगर महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकारी पदावर बसून जेव्हा कोरोना रुग्णाच्या आकडेवारीपासून तर लसीकरण vaccine आणि अनेक विषय जे अत्यावश्यक बाबी असतात त्यात तुम्ही कसूर करता म्हणजेच काय तर बेजाबदारीने वागत लोकांच्या जीवाशी खेळत नाही का ? असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे .अनेक गंभीर आरोपात त्यांची चोकशी होणे गरजेचे झाले होते त्यामुळेच आयुक्तांनी डॉ बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठविले.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग न ठेवणे, डेथ ऑडिट न करणे, कंटेन्मेंट झोन तयार करण्यासाठी आवश्यक माहिती न देणे असे गंभीर आरोप सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. उपायुक्त यशवंत डांगे यांची यासाठी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या निर्णयाचा पूनर्विचार करण्याची डॉ. बोरगे यांचा अर्ज आयुक्तांनी फेटाळला आहे.

महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई महापालिका आयुक्त शंकरराव गोरे यांनी केली. या कारवाईमुळे महापालिकेसह वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी आयुक्त गोरे यांना दुरध्वनी करून या कारवाईचे स्वागत केल्याचेही सांगण्यात येत आहे. ही कारवाई करताना आयुक्तांनी 17 मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यातील अनेक मुद्दे गंभीर आणि प्रशासकीय शिस्तीचा बोजवारा उडविणारे आहेत. हे मुद्दे लक्षात घेतल्यानंतर नगर शहरात कोरोनाचा कहर का वाढला, याचा अंदाज येतो. कदाचित यामुळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकार्‍यांनाही दखल घ्यावी लागली असावी. 

सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्यानंतरही डॉ. बोरगे यांचे कारवाई मागे घेतली जावी, यासाठी प्रयत्न सुरू होते. अगोदर त्यांनी पदभार सोडणे टाळले. तसेच आयुक्त गोरे यांना पत्र देऊन कारवाईबाबत पूनर्विचार करण्याची मागणी केली. मात्र आयुक्तांनी ती फेटाळल्यानंतर डॉ. बोरगे यांना पदभार सोडणे भाग पडले. केंद्र आणि राज्य सरकारने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी काही महत्त्वाचे निकष दिले होते. त्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर शोधणे आवश्यक होते. मात्र या कामावर डॉ. बोरगे यांनी नियंत्रण ठेवले नाही,  शासनाच्या निर्देशानुसार मृत पावलेल्या रूग्णांचे ऑडिट करणे आवश्यक असतानाही ते केले नाही. प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या वसुली कर्मचार्‍यांची नियुक्ती नागरी आरोग्य केंद्रावर करण्यात आली होती. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील नागरिकांची तात्काळ तपासणी करून तसा अहवाल सादर करण्याची जबाबदारी असतानाही ती पार पाडली नाही. मत्ता व दायित्त्वाचे विवरण प्रत्येक वर्षाच्या 31 मे पर्यंत सादर   करणे आवश्यक असते. वेळोवेळी सूचना देऊनही सन 2013-14 ते 2019-20 या सात वर्षांचे मत्ता व दायित्त्वे विवरण पत्रे सादर केलेली नाहीत. शहरातील रूग्णालयांनी वापरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या मोकळ्या व्हायल रूग्णनिहाय ताब्यात घेऊन त्याची दैनंदीन माहिती सादर करण्यात आलेली नाही. सीसीसी, डीसीएच, डीसीएचसी आदी तपासणी करण्यासाठी कोणत्याही निकषाचे पालन न करता परवानगी देण्यात आली. राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी अशा ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे नियंत्रण अधिकारी असतानाही अहवाल सादर करण्या आलेला नाही. 

अशा विविध 17 मुद्यांवर डॉ. बोरगे यांची चौकशी करण्यात येणार आहे. या बाबींचे पालन न केल्यामुळे त्याचे गांभिर्य नसल्याचे दिसून आले, तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन केलेले असल्याने महापालिकेची प्रतिमा मलीन झाली, असा आरोपही डॉ. बोरगे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच महापालिकेच्या पुढील आदेशापर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून, या काळात कुठेही नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही, आयुक्तांच्या लेखी परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.