08 जून : एकिकडे देशात कोरोनाची दुसरी लाटही नियंत्रणात येताना दिसते आहे. कोरोनाची प्रकरणं मोठ्या प्रमाणात कमी झाली आहेत. लसीकरणाचा वेग वाढवला जातो आहे. अशात देशातील कोरोना प्रतिबंध हटवण्याचा विचार सुरू आहे.

काही राज्यांनी कोरोना प्रतिबंध शिथील केले आहेत. तर काही राज्य तशा तयारीत आहेत.याच दरम्यान आता जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला कोरोनाच्या मोठ्या धोक्यापासून सावध केलं आहे.कोरोना प्रतिबंध हटवण्याची घाई करू नका, हे धोकादायक ठरू शकतं, असं डब्ल्यूएचओने भारताला म्हटलं आहे.

भारतातील डेल्टा व्हेरिएंटसह इतर चिंताजनक व्हेरिएंट्सचं वाढतं संक्रमण पाहता कोरोना प्रतिबंध हटवणं खतरनाक ठरू शकतं. ज्या लोकांना अद्याप कोरोना लस घेतली नाही आहे, त्यांना कोरोना नियमांपासून शिथिलता देणं धोकादायक ठरू शकतं, असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस घेब्रेयासस यांनी सांगितलं आहे.