अहमदनगर (प्रतिनिधी) : जागतिक महामारी कोविड19 म्हणजेच कोरोनाची दुसरी लाट हळुहळु आपल्या शहरात ओसरत असल्याचे सध्या तरी दिसत आहे.एकीकडे कोरोना पेशंट आणि त्यांना आवश्यक असणारे ऑक्सिजन बेड आणि इतर अत्यावश्यक असणार्‍या सोयी-सुविधांसाठी विविध सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनीधींची धावपळ. कोरोनाशी दोन हात करतांनाच दुसरीकडे अहमदनगर शहरातील विविध प्रभागांमध्ये विकासकामांचा वेग देण्याचे काम करीत असल्याचे दिसत आहे ते म्हणजे आपल्या शहराचे तरुण तडफदार आणि कार्यतत्पर कार्यशील आमदार संग्राम जगताप.

कोरोना महामारीसाठी शहरातील विविध हॉस्पिटल आणि आरोग्य अधिकार्‍यापासून तर विविध राज्य शासन पातळीवर आवश्यक असे नियोजन करत आ.संग्राम जगताप सदैव कार्यरत असल्याचे आपण अहमदनगरवासिय अनुभव करीत आहोत आणि या कोविड युद्धातच शहराच्या विकासालाही खीळ बसु नये या दृष्टिकोनातुन शहरातील रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम हाती घेतले आणि फक्त स्वतःच्या निधीतून रस्ते करणे इथेच न थांबता प्रत्येक डांबरीकरण कामावर फक्त उद्घाटनापुरते न जाता ते काम दर्जेदार आणि उत्कृष्ट होणे करीता कायम त्या-त्या कामांवर प्रत्यक्ष भेटी देऊन ठेकेदार आणि मनपा अभियंत्याचे ताळमेळातून रस्त्यांच्या कामावर स्वतः उभे राहत काम करुन घेतल्याचे सर्वच शहरातील प्रभागात पहावयास मिळत आहे.

आ.जगताप हे फक्त अहमदनगर शहरातील रस्ते डांबरीकरणच नाही तर विविध प्रभागात रस्ते सुशोभिकरण कामांवरही भर देत आहेत.असेच एक काम पुर्णत्वाकडे गेले असून अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील अशोका हॉटेल ते रामचंद्रखुंट रस्ता झेंडीगेट येथे डांबरीकरण आणि रस्त्याच्या दोन्ही बाजुस उत्कुष्ट असे पेव्हिंग ब्लॉकचे काम पुर्ण झाले आहे आणि स्थानिक ज्येष्ठ नगरसेवक नज्जु पहेलवान यांचा पाठपुरावा आणि कर्तुत्ववान आमदार संग्राम जगताप यांच्या व्हिझनमुळेच या भागास अत्यंत सौंदर्य प्राप्त झाले आहे.

या कामासाठी ठेकेदार इम्रान जहागिरदार यांनी डांबरीकरणासाठी उच्च दर्जाचे मशीनरी आणि साहित्य वापरुन आणि आ.संग्राम जगताप यांचे निर्देशानुसार नगरसेवक नज्जु पहेलवान यांच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्याचे डांबरीकरण आणि पेव्हिंग ब्लॉक सुशोभीकरणाचे काम पुर्ण झाले.विशेष म्हणजे झेंडीगेट येथील हा रस्ता महिना दोन महिन्यापुर्वीच पुर्ण झाला असता परंतु आ.संग्राम जगताप यांच्या निर्देशानुसार रस्ता करण्यापुर्वी फेज-2 वाल्यांची खोदाई,पाईप जोडणी त्यानंतर ड्रेनेज वाल्यांची खोदाई जोडणी आणि त्यानंतर स्थानिक रहिवाशांच्या काही नळ कनेक्शन जोडणी वगैरे बारीक वाटणारे परंतु नविन रस्ते होण्याआधी हे सर्व काम पुर्ण करुन त्यानंतरच ठेकेदार इम्रान जहागिरदार यांनी डांबरीकरणास सुरवात केली त्यामुळे हा रस्ता अत्यंत उत्कृष्ट असा झाला आहे.

याबाबत अधिक माहिती आणि प्रतिक्रिया आपण आमदार संग्राम जगताप यांच्याशी घेतली आणि त्याबरोबच स्थानिक रहिवाशांची प्रतिक्रीयाही जाणुन घेतल्या.