File Photo

नवी दिल्ली: देशातील किरकोळ इंधनाच्या किंमती विक्रम मोडत आहेत. आज मंगळवार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग दुसर्‍या दिवशी वाढ करण्यात आली. १५ मे पासून एका दिवसाच्या अंतराने किंमतीत सतत वाढ होत आहे, परंतु आज सलग दुसऱ्या दिवशी किंमती वाढल्या आहेत. आज पेट्रोलच्या दरात २७ पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरातही २३ पैशांची वाढ झाली आहे. देशातील बर्‍याच शहरात पेट्रोल १०० च्या पलीकडे विकले जात आहे आणि राजधानी दिल्लीत ते ९४ च्या पुढे विक्री सुरु आहे.