अहमदनगर । गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे अर्थकारणावर विपरित परिणाम झाला आहे. अनेकांपुढे रोजगाराचा, नोकरीचा प्रश्न उभा राहिला आहे. हीच बाब ओळखून जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) अहमदनगरच्यावतीने अहमदनगर शहराच्या स्थापनादिनानिमित्त नगरकरांना नोकरी, रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जितो अहमदनगरने जितो जॉब्स ही संकल्पना राबवित ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरु केला आहे. यात सर्वसामान्य गृहिणींपासून उच्च शिक्षितापर्यंत प्रत्येक जण स्वत:ची नोंदणी करू शकेल. ज्या आस्थापना, उद्योगांना कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे, ते या नोंदणीकृत उमेदवारांमधून पात्रतेनुसार निवड करतील.

या जितो जॉब्स उपक्रमाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी जितो अहमदनगरचे अध्यक्ष अमित मुथा, सेके्रटरी प्रितेश दुगड, गौतम मुनोत, जितो जॉब समन्वयक तुषार कर्नावट, सहसमन्वयक अनिकेत सुराणा, जितो लेडीज विंग्जच्या मेघना मुनोत, जवाहर मुथा, विजय गुगळे, परेश लोढा, सुमंगला मुनोत, वैशाली चोपडा, अलोक मुनोत, सौरभ भंडारी, पुनित भंडारी, केतन मुनोत, आशिष मुनोत, मयुर पटवा, दीपाली मुथा, प्रिती नहार, सोनली डुंगरवाल आदी उपस्थित होते.

तुषार कर्नावट यांनी सांगितले की, जितो जॉब्सअंतर्गत जितो अहमदनगरचे फेसबुक पेज व इन्स्टाग्रामवर अर्ज करण्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लिंकवरील गुगल फॉर्मवर इच्छुकांनी आपली संपूर्ण माहिती नोंदवायची आहे. यात वर्क फ्रॉम होम, सर्व्हिस फ्रॉम होम, वर्क ऍट ऑफीस, फिल्ड वर्क अशा स्वरुपाचे पर्याय आहेत.

अकाउंटींग, आर्किटेक्चर, आयटी, वैद्यकीय क्षेत्र, मार्केटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, इंटेरियर डिझाईन, लिगल सर्व्हिसेस,कन्स्ट्रक्शन, स्वयंपाकी, मेस, विणकाम, शिवणकाम, सौंदर्य प्रसाधने, माळीकाम, हारफुले तयार करणे, नृत्य प्रशिक्षण, सजावट, ड्रायव्हिंग प्रशिक्षण, मसाला, पापड बनवणे, घरकाम, फिटनेस ट्रेनर, डेटा एंट्री ऑपरेटर अशा विविध क्षेत्रात नोकरी, सेवा पुरवठा करण्याची संधी याव्दारे मिळणार आहे.

संपूर्ण माहिती ऑनलाईन भरायची असून प्रत्येकाला पात्रतेनुसार संधी मिळेल या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. शेवटी सेके्रटरी प्रितेश दुगड यांनी आभार मानले. अधिक माहितीसाठी 8698652727 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.