
शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांमधील दुकाने सुरू राहणार
पुणे (दि ३१ मे २०२१) : कमी रुग्णसंख्या असलेली शहरे आणि जिल्ह्य़ांमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली राहू शकणार आहेत. या पार्श्वभूमीव आज पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत, शहरातील नव्या निर्बंधांबाबत माहिती दिली.
पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सोमवारी ते शुक्रवारी सुरू राहतील महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांमधील दुकाने सुरू राहणार आहेत. याशिवाय, शहरातील उद्यानं, व्यामशाळा(जिम), हॉटेल बंद राहणार असून, पार्सल सुरू राहणार आहे.
पुढील दहा दिवसांसाठी हा आदेश असणार आहे. आता २ वाजेपर्यंत नागरिकांच्या दृष्टीने सर्व सेवा सुरू राहणार आहेत. पण त्यानंतर नागरिकांनी बाहेर पडू नये. पीएमपीएमएल बस सेवा अत्यावश्यक सेवेत काम करणार्यांसाठी सुरू राहणार आहे, इतर नागरिकांना त्याद्वारे प्रवास करता येणार नाही, अशी देखील महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारपरिषदेत माहिती दिली.