अहमदनगर : संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात सध्या गाजत असलेले हनी ट्रॅप प्रकरणी नगर तालुक्यातील जखणगाव येथील हनीट्रॅप प्रकरणातील आरोपी महिला आणि तिचा साथीदार अमोल मोरे या दोघांना दुसर्‍या गुन्ह्यात वर्ग करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या दोघांची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

आरोपींचा क्कॉरंटाईन कालावधी संपल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तर त्यांना मदत करणारा आरोपी वाळूतस्कर बापू सोनवणे आणि सचिन खेसे यांना 26 मेपर्यत पोलिस कोठडी मिळाली आहे.

नगर तालुक्यातील एका व्यावसायिकाला आपल्या जाळ्यात ओढत अश्लील व्हिडीओचे चित्रीकरून खंडणी मागितल्याप्रकरणी नगर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल आहे. यातील आरोपी महिला, तिचा साथीदार अमोल मोरे आणि वाळूतस्कर बापू सोनवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

याचप्रकारे एका अधिकार्‍याकडे देखील खंडणी मागितल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल असून यातील आरोपी सचिन खेसे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर आरोपी सागर खरमाळे आणि महेश बागले हे दोघे फरार आहेत. 

आरोपी महिला, अमोल मोरे, बापू सोनवणे आणि सचिन खेसे यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपी महिला आणि अमोल मोरे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली तर आरोपी बापू सोनवणे आणि सचिन खेेसे यांना 26 मे पर्यत कोठडी सुनावली आहे.

आरोपी महिला आणि मोरे यांना दुसर्‍य गुन्ह्यात वर्ग करण्याचा आदेश न्यायालयाने दिला असून ते सध्या न्यायालयील कोठडीत आहेत. त्यांचा क्कॉरंटाईन कालावधी संपल्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप हे करत आहेत.