श्रीरामपूर (प्रतिनिधी)- येथील साहित्य प्रबोधन मंचतर्फे विनोदी कथा लेखन स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती मंचचे कार्याध्यक्ष स्वामीराज प्रकाश कुलथे यांनी केले.    

साहित्य प्रबोधन मंचचे अध्यक्ष डॉ. शिवाजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली.त्यामध्ये कार्याध्यक्ष स्वामीराज कुलथे यांनी सांगितले की आजच्या काळात कथालेखनासाठी अनेक विषय आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना विविध अनुभव येतात अशा वातावरणावर किंवा विविध जीवन दर्शनावर आधारित विनोदी कथा वाचकांना एक आनंदपर्वणी वाटेल.

अशा कथा स्पर्धेचे महत्व त्यांनी विशद केले. आणि साहित्य प्रबोधन मंचच्यावतीने आयोजित या स्पर्धेचे राज्यस्तरीय नियोजन केले असून राज्यातील जास्तीत जास्त लेखकांनी यात सहभाग घ्यावा, असे स्वामीराज कुलथे यांनी सांगितले. 

या यावेळी मंचचे संस्थापक डॉ. बाबुराव उपाध्ये, मार्गदर्शक माजी प्राचार्य टी. ई. शेळके, पत्रकार प्रकाश कुलथे, स्नेहप्रकाश प्रकाशनच्या प्रमुख सौ. स्नेहलता कुलथे, सौ. मंदाकिनी उपाध्ये, कवी पोपटराव पटारे, मंचचे उपाध्यक्ष राज जगताप, कोषाध्यक्ष सौ.आरती उपाध्ये, सचिव सौ. संगीता अशोकराव कटारे, फासाटे ऑनलाईन उपस्थित होते.

कथालेखकाने आपली स्फुटकथा टाईप करून प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या 9270087640 व अध्यक्ष शिवाजीराव काळे यांच्या 9960607633 या व्हाट्सपवर क्रमांकावर 30 जून 2021 पर्यंत पाठवावी, प्रत्येक कथा लेखकाने आपले नाव ,पत्ता व दूरध्वनी क्रमांक आपल्या कथेच्या शेवटी लिहून पाठवावा, असे आवाहन मंचचे कार्याध्यक्ष स्वामीराज कुलथे यांनी केले.