
मुंबई : सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचा असणारा जगदीश लाड हा नवी मुंबईत राहायचा. नंतर तो वडोदरा येथे स्थायिक झाला होता. तिथे त्याने स्वत:ची व्यायामशाळा सुरु केली होती. जगदीश लाडने नवी मुंबई महापौर श्री चा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्री मध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालं होतं. मिस्टर इंडिया स्पर्धेतही जगदीश लाडने आपली छाप पाडत दोन वेळा गोल्ड मेडल जिंकलं होतं. दरम्यान वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदक मिळवलं होतं.
जगदीश लाडचं करोनामुळे निधन
करोनाची लागण झाल्यानंतर जगदीश लाड उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच त्याचं निधन झालं.जगदीश लाड हे 34 वर्षांचे होते अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आणि भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जगदीश लाडच्या निधनाने बॉडीबिल्डिंग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.