नवी दिल्ली (दि २६ एप्रिल २०२१) : 18 वर्षावरील सर्व लोकांना कोरोनावरील लस मोफत दिली जाणार असल्याची माहिती देशाची राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. लसीकरण मोहिमेसाठी 1 कोटी 34 लाख डोसेस खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. एका लस निर्मात्या कंपनीने राज्यांना डोस 400 रुपयांना मिळेल असे सांगितले आहे तर दुसऱ्या कंपनीने डोस 600 रुपयांना मिळेल,असे म्हटले आहे. तिकडे केंद्र सरकारला ही लस केवळ 150 रुपयांत मिळणार आहे. वास्तविक लसीची किंमत एकच ठेवणे गरजेचे आहे. माफक दरात राज्यांना लस मिळावी, याकरिता केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, असे केजरीवाल यांनी सांगितले. येत्या शनिवारपासून लसीकरण मोहीम सुरू होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. सरकारी रुग्णालयात मोफत लस दिली जाण्याची शक्यता असून खासगी रुग्णालयात त्यासाठी ठराविक पैसे मोजावे लागतील. कोरोनाचे संकट भयावह आहे. नफेखोरीची हि वेळ नसून व्हॅक्सिन निर्माण करणाऱ्या कंपनीने वाजवी दरात पुरवठा करावे असे आदेश केजरीवाल यांनी दिले .