नगर : शहराच्या पूर्वेला झेंडीगेट येथील जागृत दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरात श्रीराम नवमीचा उत्सव पुजारी आणि मंदिरातील ४ सेवेकरी यांनी सुरक्षित अंतर ठेऊन साजरा केला.  रामस्तृती,रामनाम,हनुमान चालीसा, आरती, आदि श्रध्दापूर्वक होते. कोरोनाचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी जे प्रयत्न सुरु आहेत त्याला यश मिळावं अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.उपस्थित मोजक्या पाच जणांमध्ये प्रसाद देण्यात आला. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.भक्तविना रामनवमीचा उत्सव गतवर्षीप्रमाणे यंदा साजरा झाला.