नाशिक : जुने नाशिक भागातील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीला आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास गळती लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वाया जात आहे. गळती बंद करण्यासाठी तांत्रिक पथकाबरोबरच अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, 11 रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावल्याची माहिती नामदार राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

महापालिकेचे हे संपूर्ण कोविड रुग्णालय असून सुमारे दीडशे रुग्ण येथे दाखल आहेत. अनेक रुग्ण ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरवर आहेत. ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने अशा रुग्णांचा जीव धोक्यात आला असून त्यांना अन्य ऑक्सिजन असलेल्या रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येत आहे.

नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून तातडीने 15 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी झाकीर हुसेन रूग्णालयात पाठविण्यात येत आहे.वृत्तसंस्था PTI मार्फत २२ जणांचा मृत्य झाल्याचे घोषित करण्यात आले आहे

Courtesy ANI