मुंबई (दर्शक ऑनलाईन ) : संपूर्ण देशात कोरोनाच्या महामारीने थैमान माजविले असून अशा बिकट परिस्थितीत कोविड-१९ सामना करतांना एकीकडे रेमेडिसिवीर इंजेक्शनची कमतरता आणि ऑक्सिजनचाही मोठ्या प्रमाणात तुडवडा झाला असताना राजकीय पक्ष सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांनां दोष देत आपले राजकारण करत असताना दुसरीकडे काही समाजासाठी आणि देशाच्या नागरिकांसाठी अशा महामारीच्या काळात कशी मदत करता येईल यासाठी मागच्या लॉकडाउन मध्येही भरघोस मदत करणारे यावेळी ऑक्सिजनची मदत घेऊन पुढे सरसावले.

२०० ते ३०० टन ऑक्सिजन पुरविण्यास सुरवातही केली असल्याचे ट्विट करून सांगणारे टाटा उद्योग समूह टाटा स्टीलला देशभरातील नागरिकांकडून कौतुकाचे वर्षाव होत आहे.यात आता टाटा स्टील चांगल्या भावनेने ऑक्सिजन देत आहे असे गृहीत धरून आपणहि महाराष्ट्रातर्फे त्यांचे अभिनंदन करू आणि कुठलीही शंका मनात न आणता फक्त आमच्या महाराष्ट्रालाही आवश्यकतेनुसार पुरवठा होईल आणि कुठलाही राजकारण होणार नाही म्हणजे झालं .

रेमडेसिवीर तसंच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यं केंद्र सरकारकडे मदत मागत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून उपचारासाठी अत्यावश्यक असणाऱ्या मेडिकल ऑक्सिजनची आयात केली जाणार आहे. केंद्र सरकारने ५० हजार मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान राज्यं तसंच केंद्र सरकारच्या मदतीला टाटा स्टीलने धाव घेतली आहे.

टाटा स्टीलने ट्विट करत देशात निर्माण झालेली गरज लक्षात घेता २००-३०० टन ऑक्सिजन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती दिला आहे. “करोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्वाचा आहे. देशात निर्माण झालेली गरज लक्षात घेता आम्ही रोज अनेक राज्यं आणि रुग्णालयांना २०० ते ३०० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करत आहोत. या लढाईत आम्हीदेखील आहोत आणि नक्कीच आपण जिंकू,” असा विश्वास टाटा स्टीलने व्यक्त केला.