मुंबई : पुढील १५ दिवसांचा लॉकडाउन उद्या जाहीर होणार तब्ब्ल अडीच तास चाललेल्या बैठकीत निर्णय झाला आहे उद्या होणाऱ्या टास्क फोर्स च्या बैठकीत लॉकडाउन बाबत अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. सामान्य माणसांची होरपळ होउ नये याबाबत सर्वच पक्षीय नेत्यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांचा उद्रेक होणार नाही याबाबत लोकांना आपल्याला विश्वासात घेणे गरजेचे आहे अश्या अनेक सूचना केल्या आणि नेमके किती दिवस हे चालणार आहे याबाबत सर्वांना सोबत घेउन निर्णय घ्यावा असे म्हटले . उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्ही आपल्या सोबत आहोत जनतेच्या भल्यासाठी तुम्ही जे निर्णय घेणार त्याला आमचा पाठिंबा असल्याचे म्हटले गोरगरिबांसाठी काही विशेष उपाय योजना जाहीर करून आपण योग्य निर्णय घ्यावा आमचा सर्वांचा पाठिंबा आपणास आहेत असे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले.झालेल्या बठकीनंतर अशोक चव्हाण यांनी आजची बैठक हि समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया देत कठोर निर्णय घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आणि संपूर्ण लॉक डाउन लावण्यासाठी सर्वांना एकत्रित घेऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉक डाउन किती दिवस आणि कशा प्रकारे करण्यात यावा याबाबत निनिर्णय जाहिर करण्यात येईल असे चव्हाण यांनी सांगितले

कडक निर्णय अत्यावश्यक आहे तरुण आणि लहान मुले बाधित होत आहेत त्यामुळे कठोर निर्णय जाहीर गरजेचे आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.आजची बैठक हि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी घेत आहोत आणि आपण साखळी तोडण्यासाठी हा लॉक डाउन लावणार आहोत.