*दिनांक ०९ एप्रिल, २०२१*
*आज १८०० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २०२२ बाधितांची रुग्ण संख्येत भर*  *रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.२२ टक्के*

अहमदनगर: जिल्ह्यात आज १८०० रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९८ हजार २९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २०२२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११८५६ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५२७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५७९ आणि अँटीजेन चाचणीत ९१६ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३५, अकोले ०२, जामखेड ३०, कर्जत २३, कोपरगाव ४२, नगर ग्रामीण १८, नेवासा ०३, पारनेर ०१, पाथर्डी ५६, राहता ०२, राहुरी ०३, संगमनेर ३७,  श्रीगोंदा १७, श्रीरामपूर २४, कॅंटोन्मेंट बोर्ड ३० आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १६७, अकोले ४२, जामखेड ०३, कर्जत ०३, कोपरगाव ३५, नगर ग्रामीण २५, नेवासा ०८,  पारनेर १०, पाथर्डी ०२, राहाता ८८,  राहुरी १५, संगमनेर १०९, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ३६, कॅंटोन्मेंट बोर्ड १८,  इतर जिल्हा १३ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ९१६ जण बाधित आढळुन आले. मनपा १२४, अकोले ७६, जामखेड ३७, कर्जत ८८, कोपरगाव ५५, नगर ग्रामीण ७०, नेवासा ४३, पारनेर ३२, पाथर्डी ८८,  राहाता ४७, राहुरी ६८, संगमनेर २३, शेवगाव ५२, श्रीगोंदा ४०, श्रीरामपूर ५४, कॅन्टोन्मेंट बोर्ड ०९ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्येमनपा ४५६, अकोले ६२, जामखेड ४४, कर्जत ७३,  कोपरगाव ११०, नगर ग्रामीण १०७, नेवासा ७२, पारनेर ५१, पाथर्डी १३६, राहाता २०८, राहुरी ८७, संगमनेर ७१,  शेवगाव ३७,  श्रीगोंदा ३६,  श्रीरामपूर १३४, कॅन्टोन्मेंट ८१ आणि इतर जिल्हा ३५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:९८२९४*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:११८५६*
*मृत्यू:१२७३*
*एकूण रूग्ण संख्या:१,११,४२३*

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*
*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*