
अहमदनगर : अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संगमनेर कारखान्याच्या विश्रामगृह येथे पार पडली. आ.डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी शहरातील पक्षाच्या संघटनात्मक कामांची माहिती दिली. यावेळी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.
शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, निजाम जहागीरदार, अनंतराव गारदे, रियाज शेख, फारुख शेख, युवक काँग्रेस अध्यक्ष ड.अक्षय कुलट, क्रीडा विभाग शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते आदी यावेळी बैठकीला उपस्थित होते.
किरण काळे यांनी बैठकीमध्ये शहरात काँग्रेस बळकटीकरण सप्ताहात घेण्यात आलेले विविध कार्यक्रम, नेहरू पुतळा होर्डिंग विषय, शहरात झालेले पक्ष प्रवेश, एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी पक्षाने काढलेला मोर्चा आदीं बद्दल माहिती दिली. पक्ष विस्तारासाठी शहरामध्ये पुढील सहा महिन्यांसाठी हाती घेण्यात येणार्या विविध कार्यक्रमां बद्दल यावेळी चर्चा करण्यात आली. पक्ष विस्ताराच्या दृष्टीने ना.थोरात यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने ना. बाळासाहेब थोरात यांचा दोन वेळा नगर दौरा झाला होता. मात्र लवकरच पुन्हा शहराच्या दौर्यावर ते येणार आहेत. यावेळी पक्षाचे विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे किरण काळे यांनी सांगितले आहे.आढावा बैठकीत ना. थोरात यांनी काळे यांच्या कामाचे कौतुक केले. काळे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरात काँग्रेसला उज्वल भवितव्य असल्याचे यावेळी ते म्हणाले. दौर्यात शहर काँग्रेससाठी ना.थोरात स्वतंत्र वेळ देणार असल्यामुळे किरण काळे यांना पक्षवाढीसाठी शहरामध्ये विशेष बळ दिले जाणार आहे.
फारुख शेख यांनी मनपामध्ये सध्या सुरू असणार्या राजकीय घडामोडींची माहिती बैठकीत ना. बाळासाहेब थोरात यांना दिली. किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपाध्ये आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविण्याची भूमिका घेतली असल्याचे यावेळी शेख यांनी सांगितले. सत्तेपेक्षा लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य देण्याच्या सूचना यावेळी ना. थोरात यांनी बैठकीमध्ये पदाधिकार्यांना केल्या.