
पेट्रोलची शंभरी पुढील काळात पाचशेच्या घरात जाईल आणि डिझेलही ४८० पर्यंत त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने हेच भविष्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था ): दररोज होणारी इंधन दरवाढ आणि प्रदूषण त्यामुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90-95 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे अनेक वाहन कंपन्या इलेक्टिक कार आणि इलेक्ट्रिक दुचाकी निर्माण करन्यास अग्रक्रम देत आहेत आणि याचे वापरकर्ते वाढविण्यासाठी देशभर विविध उपक्रम राबविले जात आहेत तर काही कंपन्या लवकरच इलेक्ट्रिक वाहनं लाँच करणार आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक गाड्यांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. वाहन कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत, आणि विशेष म्हणजे ग्राहकांकडून आता इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. दरम्यान, देशभरात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध राज्यांमधील सरकारे प्रयत्नात आहेत. त्यात दिल्ली सरकार सर्वात पुढे आहे.पेट्रोलची शंभरी पुढील काळात पाचशेच्या घरात जाईल आणि डिझेलही ४८० पर्यंत त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने हेच भविष्य आहे असे म्हणणं वावगं होणार नाही .
इलेक्ट्रिक वाहनांसाठी 100 चार्जिंग पॉईंट्ससह येत्या सहा महिन्यांत दिल्लीत 100 नवीन चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी सुरु आहे. इलेक्ट्रिक वाहनांविषयी जागरूकता आणि ईव्ही पॉलिसीच्या फायद्यांबाबत जनजागृती करण्यासाठी दिल्ली सरकारने ‘स्विच दिल्ली अभियान” सुरु केले आहे. आता त्यात भर म्हणून इलेक्ट्रिक वाहनांसाठी दिल्ली सरकारच्या पुढाकारातून दिल्लीत अनेक ठिकाणी 100 चार्जिंग स्टेशन्स उभारले