या दरवाढी विरोधात जितके बोलले जाईल तितकी अजून केंद्र सरकार दरवाढ करत जाईल असे आता सामान्यांना वाटायला लागले आहे. तुम्ही महागाई दरवाढ आणि बेरोजगारी बद्दल बोला आम्ही तुम्हाला अजून महाग काय असते आणि आणखी दरवाढ कशी असते आणि बेरोजगारी काय ते दाखवून देतो असे केंद्र सरकार म्हणत आहे कि काय जणू याचाच प्रत्यय येण्यास सुरवात झाली आहे. पेट्रोल १०० रुपये लिटर झाले कुणासाठी तर सरकारचा म्हणणे आहे कि तुम्ही सायकली चालवा यासाठी आणि गॅस आम्ही दर चार दिवसाला भाव वाढ करणार का म्हणून तर तुम्ही चुली पेटवायच्या विसरलात म्हणून अशीच भूमिका केंद्र सरकार घेत आहे असं वाटत.

पेट्रोलियम पदार्थ दरवाढ सुरूच असून सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर दरात २५ रुपयांची वाढ केली आहे. ताज्या दरवाढीनंतर विनाअनुदानित गॅस सिलेंडरचे दर ८१९ रुपयांवर गेले आहेत. गेल्या महिन्याच्या काळात गॅस सिलेंडरचे दर तब्बल चारवेळा वाढले आहेत. सिलेंडरच्या वाढत्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.परंतु सरकारला याच काहीही घेणे देणं नाही असं दिसत आहे आणि विविध ठिकाणच्या निवडणुकांचे खर्च जनसामान्यांच्या खिशातून कशा प्रकारे काढायचे तर अशी दरवाढ करून वसूल करायचे कि काय असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.

चार दिवसांत दुसऱ्यांदा घरगुती गॅसच्या किंमती २५ रुपयांनी वाढल्या मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना झटका बसला आहे,कारण एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे.तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ केली आहे.चार दिवसांपूर्वीही एलपीजी गॅसच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ झाली होती.देशासह राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी गाठल्याने आधीच सर्वसामान्यांना फटका बसला आहे.त्यानंतर आता घरगुती गॅसच्या किंमतीतही भरमसाठ वाढ झाली आहे.गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या दरवाढीनंतर १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलेंडरचे दर ७९४ रुपयांवर गेले होते. ताज्या दरवाढीनंतर, देशाची राजधानी दिल्लीत हे दर ८१९ रुपयांवर गेले आहेत.गेल्या महिनाभरात सिलेंडर दरात तीनवेळा वाढ झाली होती. एकत्रितपणे ही वाढ शंभर रुपयांची होती. गेल्या डिसेंबर महिन्यापासून सिलेंडरचे दर तब्बल २२५ रुपयांनी वाढले आहेत.केवळ तीन दिवसां आधीच तेल कंपन्यानी सिलेंडर दरात २५ रुपयांची वाढ केली होती.म्हणजेच एका आठवड्याच्या आत दोनदा गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत