अहमदनगर : जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा व महत्त्वाचा प्रश्न असलेला पुणे-नगर शटल रेल्वेसेवा सुरु होण्यासाठी माजी खासदार दिलीप गांधी यांनी रेल्वे मंत्री ना. पियुष गोयल यांची भेट घेऊन सदर रेल्वे सेवा एप्रिल पासून कार्यान्वीत करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. या संदर्भात खासदार गांधी यांनी रेल्वे क्रांती आंदोलनाचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांना कळविले. दि.13 मार्च रोजी पुकारण्यात आलेल्या रेल्वे रोको आंदोलनासाठी विविध संघटना ठाम असून, रेल्वे मंत्रीकडून लेखी आश्वासन मिळत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी स्पष्ट केले आहे.

अहमदनगर-पुणे (व्हाया काष्टी, केडगाव) रेल्वे कॉड लाईनचे काम मागील पाच ते सहा वर्षापासून सुरू होते. ते काम पूर्ण झाले आहे. अहमदनगर व पुणे शहरातील नागरिकांची अनेक वर्षापासून सकाळ व संध्याकाळ ही शटल रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी आहे. दौंड रेल्वे स्टेशन बाहेरील कॉड लाईन टाकण्याचे काम पुर्ण झाले असून, सदरील रेल्वे सेवा त्वरित सुरू करता येऊ शकते. कॉड लाईनचे काम मागच्या वर्षी पुर्ण झाले. मात्र कोरोना महामारीमुळे ही रेल्वेसेवा सुरू होऊ शकलेली नाही. तरी 1 एप्रिल पासून अहमदनगर-पुणे रेल्वे सेवा सुरू करुन नगरकरांना नवीन वर्षाची भेट द्यावी व याबाबतचे जनरल मॅनेजर मुंबई व डी.आर.एम. सोलापूर यांना आदेश देण्याची मागणी निवेदनाद्वारे खासदार गांधी यांनी केली आहे.

नुकतेच अहमदनगर रेल्वे स्थानक येथे सदर रेल्वे सुरु करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली होती. यामध्ये अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वे रोकोचा इशारा देण्यात आला होता.तर या आंदोलनासाठी हरजितसिंह वधवा,अर्शद शेख,कारभारी गवळी,सुहास मुळे,जालिंदर बोरुडे, संजय सपकाळ,रमेश बाफना,पुणे-अहमदनगर शटल रेल्वेसेवा सुरु होण्यासाठी दिलीप गांधी यांनी घेतली रेल्वे मंत्री गोयल यांची भेट धनेश बोगावत, ए.बी. बोरा, दत्तात्रय गायकवाड, अन्वर सय्यद, हुसेन सय्यद, जयकुमार मुनोत, राजेंद्र पडोळे, कैलास दळवी, बहिरुनाथ खंडागळे, जयराम मल्लिकार्जुन, सुवालाल ललवाणी प्रयत्नशील आहेत.