करीनाने दुसऱ्यांदा मुलाला जन्म दिलाय. वांद्रे इथल्या ब्रीज कॅण्डी रुग्णालयात सकाळच्यावेळी करिनाने मुलाला जन्म दिला. शनिवारी रात्री करिनाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर रविवारी सकाळी करीनाने बाळाला जन्म दिला. बाळ आणि आई दोघांची प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय.अनेक दिवसांपासून करीनाच्या दुसऱ्या बाळासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. अनेक चाहत्यांनी तर करीनाच्या घरी भेट म्हणून खेळणीदेखील पाठवून दिली होती. चाहत्यांची ही प्रतिक्षा अखेर संपली आहे. सोशल मीडियावरुन चाहत्यांनी सैफ करीनाला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.ऑक्टोबर 2012 मध्ये सैफ आणि करीनाने लग्नगाठ बांधली होती. 2016 मध्ये करीना कपूर पहिल्यांदा आई झाली. सैफ आणि करीनाने पहिल्या बाळाचं नाव तैमूर ठेवल्यानं मोठा वाद देखील निर्माण झाला होता. मात्र यानंतर तैमूर अली खान या सोशल मीडियावरील सर्वात जास्त लोकप्रियता मिळवणारा स्टार किड ठरला. तैमूरच्या अवखळ अंदाजातले फोटो सोशल मीडियावर सतत ट्रेण्ड झाले तैमूर पाठोपाठ सैफ आणि करीना म्हणजेच सैफिनाच्या घरी छोट्या नवाबाचे आगमन झालंय.अर्थात त्यांच्या नवाबी भाषेत म्हणावे लागेल कि तैमूर अली खान आता मोठे नवाब झाले आणि सैफ करीनाच्या घरी छोटे नवाब आले.