अहमदनगर (२० फेब्रुवारी २०२१) : नुकत्याच पंजाबमध्ये पार पडलेल्या सात मनपाच्या निवडणुकीमध्ये सहा ठिकाणी काँग्रेसला निर्विवाद सत्ता मिळाली. मोगा मनपामध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळवत मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले.दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू असताना पार पडलेल्या या निवडणुकांत मतदारांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपला जोरदार चपराक दिली आहे. काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत विजयाबद्दल नगर शहरातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.माळीवाडा परिसरामध्ये शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकमेकांना गुलाल लावत पेढे भरविले. तसेच यावेळी नागरिकांना देखील पेढ्यांचे वाटप करीत विजयाचा आनंद कार्यकर्त्यांनी साजरा केला. 

यावेळी काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, निजाम जहागीरदार, अनिस चुडीवाला, डॉ.मनोज लोंढे, प्रा.डॉ. बापू चंदनशिवे, प्रा.डॉ.बाळासाहेब पवार, प्रवीण गीते, अन्वर सय्यद, मुबीन शेख, सुजित जगताप, निखिल गलांडे, नलिनी गायकवाड, कौसर खान, नीता बर्वे, सुनिता बागडे, उषा भगत, जरीना पठाण, ऋतिक शिरवाळे,रिजवान शेख, गणेश आपरे, मोहनराव वाखुरे, ॲड.सुरेश सोरटे, अजय मिसाळ, शंकर आव्हाड, फहिम इनामदार ऋषिकेश चितळकर, वैभव कांबळे, शिवम करांडे, अनविश गुंड, तन्मय सांगळे, ओम जगताप, तन्मय गुंड, संकेत गवळी,अमित गुंड आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.