अहमदनगर :  तोफखाना पोलिस स्टेशन चौक ते भिस्तबाग ते महालापर्यत रस्त्याचे काम सुरू आहे. काही भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनचे काम तसेच एमएसईबीचे अंडरग्राऊंड केबल टाकण्याचे काम सुरू आहे. ते काम लवकरच पूर्ण करून रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी दिले.तोफखाना पोलिस स्टेशन चौक ते भिस्तबाग ते महालापर्यत रस्त्याचे कामाबाबत मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे म्हणाले की, या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे.

या रस्त्यापैकी ज्या भागामध्ये कोणतीही अडचण नाही अश्या भागात त्वरीत रस्त्याचे काम सुरू करावे.  ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची लाईन टाकावयाची आहे ते काम येत्या पंधरा दिवसात पूर्ण करावे. एमएसईबी कडून अंडरग्राऊंउ केबल टाकण्याचे काम सुरू आहे ते लवकर पूर्ण करून घेण्याचे आदेश दिले. हा रस्ता उपनगरातील मुख्य रस्ता असून या रस्त्यावर वाहतुक मोठया प्रमाणावर आहे. त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यास त्रास होतो.

काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करून नागरिकांसाठी रस्ता वाहतुकीस खुला करावा.रस्त्याचे काम मॉडेल काम म्हणून परिचित होईल असे करावे. काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्यामध्ये काही कामासाठी रस्ता खोदावा लागल्यास संबंधीत अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल यादृष्टिने अधिकारी यांनी देखील संबंधीत ठेकेदाराकडून काम पूर्ण करून घेण्यात यावे.

यावेळी मा.श्री.महेंद्रभैय्या गंधे म्हणाले की, रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. परिसरातील नागरिकांना जाण्या येण्यास त्रास होत आहे. काही ठिकाणी रस्त्याला क्रॉसिंग पाईपलाईन टाकून ठेवाव्यात. ब-याच भागात अडचणी सुटलेल्या आहेत. त्यामुळे रस्ता करण्यास कोणताही अडथळा नाही.  मनपाच्या संबंधीत अधिकारी यांनी देखील ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या तातडीने सोडवाव्यात. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा दयावा असे ते म्हणाले.

यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष मा.श्री.महेंद्रभैय्या गंधे,उपायुक्त डॉ.श्री.प्रदिप पठारे, मा.श्री.संजय ढोणे, मा.श्री.सतिष शिंदे, शहर अभियंता श्री.सुरेश इथापे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख श्री.आर.जी.सातपुते, इलेक्ट्रीक विभाग प्रमुख श्री.आर.जी.मेहेत्रे, अभियंता श्री.मनोज पारखे, उदयान विभाग प्रमुख श्री. यु.जी.म्हसे, इलेक्ट्रीक विभागाचे श्री.तिवारी आदी उपस्थित होते.