अहमदनगर (दि ६ फेब्रुवारी २०२१) : जगातील विकसित देशाप्रमाणे आपल्या भारताचाही विकास व्हावा असे कायम वाटत आहे. विकसित देशांमध्ये इंजीनियरिंग क्षेत्रात खूप सुधारणा झाली असल्याने तेथे वेगाने विकास होत आहे. आपल्या देशाच्याही वेगाने विकासासाठी आधुनिक इंजीनियरिंग आपणही स्वीकारले पाहिजे. नगरही विकास झाले पाहिजे असे प्रत्तेकजण म्हणतो पण प्रयत्न कोणीच करताना दिसत नाही, अशी खंत पुणे मेट्रो पॉलेटीयनचे मुख्य कार्यकारी अभियंता चंद्रकांत जावळे यांनी व्यक्त केली.जावळे म्हणाले, पुढील काळात होणारे विकास कामे जास्तीतजास्त दर्जेदार, उत्कृष्ठ व पारदर्शी पद्धतीने व्हावीत. नगर मधील बिल्डर असोशिएशन व अधिकार्‍यांमध्ये चांगले समन्वय आहे. असोशिएशनच्या सदस्यांनी सामाजिक जाणीव जपली आहे. नगरमध्ये अभियंता म्हणून काम करतांना खूप काही शिकावयास मिळाले आहे. जुनी ओळख असलेले सर्वजण भेटल्याचा आनंद आहे.

नगरमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून काम केलेले चंद्रकांत जावळे यांना नुकतेच पुणे मेट्रो पॉलेटीयनचे मुख्य कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती मिळाली आहे. याबद्दल बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाच्या नगर शाखेच्यावतीने त्यांचा माजी कुलगुरु डॉ.सर्जेराव निमसे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी असोशिएशनचे चेअरमन मच्छिंद्र पागीरे, संस्थापक जवाहर मुथा, माजी अध्यक्ष महेश गुंदेचा, सा.बा. कार्यकारी अभियंता जे.डी.कुलकर्णी, कार्यकारी अभियंता एस.डी.पवार, कार्यकारी अभियंता ए.व्ही.चव्हाण, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता सानप, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण, वल्ड बँक शाखेचे कार्यकारी अभियंता एन.एन.राजगुरू, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एन.डी. कुलकर्णी आदींसह बिल्डर असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ.सर्जेराव निमसे म्हणाले, तंत्रज्ञानात जागतिक स्तरावर मोठा बदल होत असल्याने इंजीनियरिंग क्षेत्रातही बदल होत आहे. आपल्या येथील अभियंते जगाच्या तोडीसतोड उत्कृष्ठ काम करत आहेत. मात्र कामांचा वेग कमी आहे. सरकारी योजनेतील कामे दर्जेदारच झाली पाहिजे. सरकारी अधिकारी, अभियंते व ठेकेदार यांनी एकाच विचाराने काम केलेतर विकासकामे दर्जेदार होतील. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एन.डी. कुलकर्णी यांनी चंद्रकांत जावळे यांचा सत्कार करून गौरोद्गार काढले. प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण यांनी नगर जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा घेतला. प्रास्ताविकात जवाहर मुथा यांनी बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाच्या नगर शाखेच्या वतीने होत असलेल्या कामाची माहिती दिली. सुत्रसंचलन निखील जगताप यांनी केले. चेअरमन मच्छिंद्र पागीरे यांनी मानले. यावेळी सदस्य अनिल कोठारी, शरद मेहेर, डी.बी.जगताप, संजय गुंदेचा, दीपक दरे, मिलिंद वायकर आदींसह सदस्य उपस्थित होते.