आमदार संग्राम जगताप यांनी शासनाकडे पाठपुरावा करून 5 कोटींचा निधी नाट्यगृहासाठी मिळविणे कौतुकास्पद : प्रशांत दामले

अहमदनगर : नाट्य सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी हक्काचे नाट्यगृह तयार होत आहे आणि यासाठी नाट्य कलाकारांबरोबरच राजकीय क्षेत्रातील नेतृत्व सकारात्मक प्रयत्न करतात ही राज्यातील आदर्श घटना असून सर्वांच्या इच्छाशक्तीमुळे अहमदनगर शहरात महानगरपालिकेचे हक्काचे अद्यावत असे नाट्यगृह लवकरच तयार होणार आहे, असे प्रतिपादन जेष्ठ आणि लोकप्रिय नाट्य-सिने अभिनेते श्री.प्रशांत दामले यांनी केले. प्रोफेसर कॉलनी चौकातील नाट्यगृहाची पाहणी आ. संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, सभागृह नेते मनोज दुलम, नगरसेवक अजिंक्य बोरकर, रविंद्र बारस्कर, भाजप शहर जिल्हा अध्यक्ष महेंद्र (भैय्या) गंधे, नाटय परिषदेचे मध्यवर्तीचे सहकार्यवाह सतीश लोटके, अ. भा.चित्रपट महामंडळाचे जिल्हा समन्वयक शशिकांत नजान, नगर शाखेचे अध्यक्ष अमोल खोले जेष्ठ रंगकर्मी मधुसूदन मुळे, सदानंद भणगे, श्याम शिंदे, जयंत येलूलकर आर्किटेक्ट मनोज जाधव मनपा शहर अभियंता सुरेश इथापे यांच्या समवेत करण्यात आली. यावेळी प्रशांत दामले बोलत होते. ते पुढे म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांनी शासनाकडे पाठपुरावा करून 5 कोटींचा निधी नाट्यगृहासाठी मिळविला ज्या शहरातील लोकप्रतिनिधी सांस्कृतिक क्षेत्राला विकासाकडे घेऊन जातात त्या शहराची सांस्कृतिक प्रगती नक्कीच होते.नाट्यगृहाच्या प्रगतीपथावर असणार्‍या बांधकामास आपण वेळोवेळी भेट देऊ.

    आ.संग्राम जगताप म्हणाले की नाट्यगृह लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून निधीची कमतरता पडू देणार नाही. तसेच नाट्यगृह सुरू होण्यापूर्वी भविष्यात येणार्‍या खर्चाचा विचार करून एक ठराविक कायम निधी राखीव ठेवला जावा. महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की नागरी सुविधा देतानाच शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.कलाकारांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत या साठी आम्ही प्रयत्नशील राहू. नाट्यगृह परिपूर्ण व्हावे यासाठी कलाकारांची एक समिती तयार करावी असे पत्र यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने सतीश लोटके,शशिकांत नजान अमोल खोले आणि कलाकारांच्या हस्ते महापौर यांना देण्यात आले.

सुरवातीला प्रशांत दामले यांचा शहराच्या वतीने आ.संग्राम जगताप महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार शशिकांत नजान यांनी मानले. कार्यक्रमास सर्वश्री नियामक मंडळाचे सदस्य सतीश शिंगटे,अभिनेते मोहिनीराज गटणे,दीपक शर्मा, अविनाश कराळे, तुषार देशमुख, अभिजित दरेकर, शिवाजी आण्णा कराळे, अमित गटणे, अनंत रिसे, तुषार चोरडिया,स्वप्नील नजान, विशाल कडूस्कर, सामाजिक कार्यकर्ते मनोज ताठे, सतीश शिंदे संगीत क्षेत्रातील राम शिंदे, पवन नाईक, बालरंगभूमी अध्यक्षा उर्मिला लोटके पदाधिकारी श्रिया देशमुख,विद्या जोशी, टिना इंगळे, संध्या पावसे महापालिका अभियंता मनोज पारखे उपस्थित होते.