अभिनेता वरुण धवनच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. वरुण आणि त्याची प्रेयसी नताशा दलाल दोघेही अलिबागमध्ये दाखल झाले आहेत.उद्या २४ जानेवारी २०२१ रोजी बॉलिवूड अभिनेता वरुण धवन प्रेयसी नताशा दलालबरोबर विवाह बंधनात अडकणार आहे.अलिबागच्या समुद्र किनाऱ्याजवळ असणाऱ्या 'द मॅन्शन हाऊस' या रिसॉर्टवर त्यांचे लग्न होणार आहे. वरुण-नताशाच्या लग्नाचे नियोजन करणारी टीम आधीच रिसॉर्टमध्ये पोहोचली आहे. तीन दिवस हा लग्न सोहळा चालणार आहे. डेव्हिड धवन यांच्यासोबत अनेक चित्रपट करणारा बॉलिवूडचा दबंग सलमान खानला या लग्नाचे निमंत्रण देण्यात आले आहे कॅटरिना कैफलाही या लग्नाचे निमंत्रण देण्यात आले आहे.त्याशिवाय शाहरुख खान,करण जोहर,श्रद्धा कपूर,आलिया भट्ट,साजिद नाडियादवाला,सिद्धार्त मलहोत्राही या लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.