मराठी माणसाला बळ देण्याचे काम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. प्रादेशिक पक्षाचं राजकारणही बाळासाहेबांनी सुरू केले. महाराष्ट्रातील भाजप पक्षाच्या अस्तित्वाचे श्रेयही बाळासाहेबांनाच जाते. असा नेता शतकातून एकदाच होतो. त्यामुळे बाळासाहेब महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहतील, अशी भावना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी त्यांच्या आठवणींना राऊत यांनी उजाळा दिला. हिंदूत्वाची लाट निर्माण करण्याचे श्रेय बाळासाहेब ठाकरे यांना जाते. आज मराठी माणूस सर्व क्षेत्रात झेप घेत आहे. मराठी माणसाला बळ देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्यामुळेच आम्ही घडलो. आज महाराष्ट्रातील भाजपच्या अस्तित्वाचे श्रेयही बाळासाहेबांनाच जाते. शिवसेनेने भाजपसोबत युती केल्यामुळेच भाजप महाराष्ट्रात पोहोचली. त्यामुळे महाराष्ट्राने बाळासाहेबांना स्मरणात ठेवावे, अशी भावना संजय राऊत यांनी मांडली