अहमदनगर : भारत सरकार मान्यताप्राप्त सामाजिक संघटना भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्याच्या नगर तालुका अध्यक्षपदी चिचोंडी पाटील येथील तरुण तडफदार आणि नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असणारे विविध जनसामान्यांच्या अडचणी समाजकार्या मार्फत नेहमी न्याय देण्यासाठी धडपड करणारे युवक सामाजिक कार्यकर्ता युवराज पोपट हजारे यांची निवड नगर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबाबतचे नियुक्ती पत्र नुकतेच त्यांना संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी दिले. या निवडी बद्दल संस्थापक अध्यक्ष मा. भाऊ साहेब कांबळे मा. संतोष कांबळे , सचिन ठुबे आदी मान्यवरांमार्फत युवराज हजारे यांचे अभिनंदन करण्यात आले.