अहमदनगर : आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहता तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीवर दणदणीत विजय मिळविले. फक्त त्यांचे गाव लोणी खुर्द येथील जागा त्यांच्या हाती आली नाही . अगदी पूर्वनियोजन आणि निवडणुकांचे सुसूत्रीकरण याबद्दल विखे पाटील परिवार ओळखले जातेच संपूर्ण राहता तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींपैकी २४ वर विजय मिळवून त्यांनी एकहाती सत्ता खेचून आणली.

गावात विजय आणि घरात धक्का

लोणी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांनी १७ पैकी १३ जागा जिंकल्या आहेत. विखे यांच्या पॅनलला अवघ्या चार जागांवर समाधान मानावं लागलं आहे. जनार्दन घोगरे यांच्या परिवर्तन पॅनलनं विखेंना धक्का दिला आहे. संपूर्ण राहता तालुक्यातील 24 ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाले असले तरी स्वतः त्यांच्या गावात फक्त 4 जागा मिळाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात विविध चर्चांना उधाण आले.