अहमदनगर (प्रतिनिधी ): कुलधरण (ता.कर्जत) येथील विश्व शाहीर परिषदेच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंती उत्सवात लहान मुलांना फलाहार चे वाटप करून जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. एस. टी स्थानक जवळच्या प्रागंणात हा जयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता. जेष्ठ कलावंत अरुण भवाळ शाहीर परिषदेचे जिल्हाध्यक्ष व शासनाच्या मानधन समितीचे सदस्य भाऊसाहेब उडाणशिवे, संदीप सुपेकर, जेष्ठ कलावंत विठ्ठल भवाळ , धनंजय गजरमल , तमाशा कलावंत दत्तू ठोकळे ,रोहिदास भवाळ, अंबादास भवाळ, बाप्पू गजरमल , इस्माईल शेख, कलाबाई शिंदे आदींनी जिजाऊंच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या जीवनचरित्राचा मागोवा घेतला यावेळी ऐतिहासिक नाटक , वग यातील प्रसंग सादर करून लोककला सादर केली. 

ग्रामस्थ संतोष म्हस्के ,संजय गुंड, विशाल काळे, राम सुपेकर ,मनू जगताप , नाना सुपेकर , बाळासाहेब सुपेकर आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. शालनताई जगताप ,माजी नगर सेविका गिरीजाबाई उडाणशिवे, मंगल भवाळ, नंदा भवाळ , शीतल क्षीरसागर  आदींच्या हस्ते मुलांना खाऊ आणि फळ वाटप करण्यात आले. 

जाऊंनी शिवरायांना घडविले तीच प्रेरणा प्रत्येक महाराष्ट्रीय स्त्री आपापल्या मुलांना मार्गदर्शन करून त्यांना घडवतील असा आशावाद गिरिजाबाई उडाणशिवे यांनी यावेळी व्यक्त केला.फोटो ओळी : कुळधरण येथे विश्र्व शाहिर परिषदेच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊंना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी कलावंत अरुण भवाळ,ृध्यक्ष भाऊसाहेब उडाणशीवे,धनंजय गजरमल,कलाबाई शिंदे,मा.नगरसेविका गिरजाबाई उडाणशिवे आदी.