अहमदनगर : हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडले गेलेले मावळे निष्ठेने, एक विचाराने लढले, अनेकांनी प्राणाची आहुती दिली त्यात ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ ही म्हण सार्थ करणारे जिवाजी महाले होते. त्यांचे नाव मराठी माणसाच्या हृदयात कोरले गेले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा आजच्या स्मृतिदिनामुळे अधिक उजळली आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.प्रेमदान नजिक जिवबा महाले चौक असे नाममकरण 2015 मध्ये झालेल्या या ठिकाणी नव्या फलकाचे अनावरण जिवा महाले स्मृतिदिनाचे औचित्य साधून करण्यात आले. यावेळी आ.जगताप अध्यक्षपदावरुन बोलत होते.

महापौर बाबासाहेब वाकळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सकल नाभिक समाज आयोजित जिवा महाले स्मृतिदिनाचे औचित्य साधून प्रेमदानच्या दालनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आ.संग्राम जगताप पुढे म्हणाले की, छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यात बारा बलूतेदारांसह सर्वांनी एकजूट दाखवली. या मावळ्यांनी निष्ठेने पराक्रम गाजवला तशी एकजूट आपणही दाखवून सत्तेच्या माध्यमातून शहराचा विकास घडवू. महापालिकेत सत्ता बदलत असते, पण आज शहरात स्वच्छता निर्माण करण्यास कचरा घंटा गाड्यांची यंत्रणा राबविल्याने या कामात प्रगती आहे, त्याचे प्रमाणपत्र पुरस्काराच्या माध्यमातून मनपाला प्राप्त आहे.सकल नाभिक समाजाची मागणी मान्य करुन 2015 ला या चौकाचे नामकरण ‘जिवबा महाले चौक’ करण्यात आले असे सांगून यापुढे याच नावाने चौक ओळखला जावा, त्याची सुरुवात आपणच केली पाहिजे, असे आवाहन केले.

महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आपल्या भाषणात ‘जिवबा महाले चौक’ असा उल्लेख सिटी बस थांब्यासाठी करण्यात येईल तसेच मनपा आणि शासकीय कागदोपत्री याच नावाचा उल्लेख या पुढे केला जाईल, असे आश्वासन देऊन समाजाच्या मागण्यांचाही विचार केला जाईल, असे सांगितले.प्रारंभी सकल नाभिक समाजाचे बाळासाहेब भुजबळ यांनी प्रास्तविकात शिवबा काशिद आणि जिवबा महाले यांची जयंती मनपात छायाचित्र लावून साजरी करावी, असे सूचविले. श्री.रामदास आहेर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

नगरसेवक सर्वश्री विनित पाउलबुधे, सुनिल त्र्यंबके, कुमार वाकळे, अजय चितळे, बाळासाहेब पवार, निखिल वारे, प्रेमदानचे संचालक सुनिल नहार, संजय ढोणे, अ‍ॅड.शिवाजी डोके, बाळासाहेब जगताप, जालिंदर बोरुडे, सतिष शिंदे, अविनाश देडगांवकर आदिंनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक औटी यांनी केले. तर आभार पत्रकार राजेश सटाणकर यांनी मानले.सकल नाभिक समाजाचे माऊली गायकवाड, अनिल (बापू)औटी, रमेश बिडवे, बाबूराव दळवी, अनिल निकम, विशाल सैंदाणे, श्रीपाद वाघमारे, बाबुराव ताकपेरे, योगेश पिंपळे, शाम औटी, सचिन खंडागळे, युवराज राऊत, संदिप सोनवणे, मगर आप्पा, रमेश भुजबळ, श्रीरंग गायकवाड, अनिल इवळे, रघुनाथ औटी, निलेश पवळे, शहाजी कदम, संदिप वाघमारे, ज्ञानेश्वर निकम, अजय औटी, जितेंद्र जगताप, आदिंनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.