अहमदनगर – फर्निचर तसेच आकर्षक इंटेरिअरसाठी उच्चप्रतीचे विनियर्स प्लायवूड निर्मिती करणारी भारतातील अग्रगण्य ग्रीनप्लाय इंडस्ट्रीजने आयोजित केलेल्या विनियर्स प्लायवूडचे भव्य प्रदर्शन व विक्रीचा शानदार शुभारंभ नक्षत्र लॉन येथे झाला. या प्रदर्शनाचे आयोजन नगरमधील श्री वर्धमान प्लायवूड सेंटर यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी नगरकरांनी विनियर्सच्या असंख्य व्हरायटीज अनुभवल्या.

यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरिअर डिझायनर्स अहमदनगर शाखेचे अध्यक्ष अवतारसिंग हिरा, अमोल खोले, कन्हैया गांधी, चंद्रकांत तागड,सौ. कल्पना गांधी, प्रवीण टकले, अजय अपूर्वा,प्रल्हाद जोशी, शैलेश सप्रे, संतोष गायकवाड, ग्रीन प्लाय इंडस्ट्रीज् लि.चे सेल्स उपाध्यक्ष श्रीपाद बीडकर, अतुल जाधव, नैनिशा शेख, यतीन पारीख, अभिषेक सिंग, पंकज पांडे, श्री वर्धमान प्लायवूडचे संचालक शैलेश मुनोत, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संतोष मुथा, संजोग मुथा, योगेश मुनोत, रोनक मुनोत, राज मुनोत, ऋतिक मुनोत आदी उपस्थित होते.

सर्वांचे स्वागत करुन रोनक मुनोत यांनी सांगितले की, अहमदनगरमध्ये प्रथमच झालेल्या या प्रदर्शनात इंटेरिअर तसेच फर्निचरची शोभा वाढविणारे विनियर्सचे अनेक प्रकार, रंगसंगती, व्हरायटीज, डिझाईन नगरकरांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. आपल्या मनातील इंटेरिअर साकारण्यासाठी येथे प्रत्यक्ष निवडीचे पर्याय उपलब्ध करून दिले होते. मनपसंत व्हीनियर्स कंपनीकडून नगरमध्येच श्री वर्धमान प्लायवूड सेंटरद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.ग्रीनप्लायचे सेल्स उपाध्यक्ष श्रीपाद बीडकर यांनी यावेळी सर्वांना विनियर्सचे अनेक प्रकार दाखवून माहिती दिली. ते म्हणाले, ग्रीन प्लाय ही भारतातील नामांकित कंपनी असून, विनियर्सच्या खास व्हरायटीजसाठी नावाजली जाते. प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांना एकाच छताखाली हजारो व्हारायटीज पाहता आल्या.

नवीन बांधकाम केलेल्या ग्राहकांना फर्निचर करण्यासाठी या ठिकाणी असलेल्या विनियर्सच्या व्हारायटीजमुळे वेगवेगळी कल्पकता निर्माण झाली आहे.यावेळी सर्व इंटेरिअर डेकोरेटर्स यांनी या प्रदर्शनातील विविध व्हरायटीज व सादरीकरण पाहून समाधान व्यक्त केले. पुणे-मुंबईच्या धर्तीवरील प्रदर्शनाची अनुभूती घेतली. तसेच एका छताखाली ग्रीनप्लाय विनियर्सच्या 1 हजारहून अधिक सॅम्पलसिट्ची व्हरायटीज पाहण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. शेवटी योगेश मुनोत यांनी सर्वांचे आभार मानले. प्रदर्शन शनिवार दि.16 जानेवारी रोजी रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.