भारतातील पंजाब प्रांतात पटियाला इथं राकेश शर्मा यांचा 13 जानेवारी 1949 जन्म झाला प्राथमिक शिक्षण त्यांनी सेंट जॉर्जेस ग्रामर स्कूल हैदराबाद इथं पुर्ण केलं आणि त्यानंतर निजाम कॉलेज इथे ते ग्रॅज्युऐट झाले.वयाच्या 5 व्या वर्षीच त्यांना जेट उडवायची ईच्छा होती तरूण झाल्यावर त्यांची ही ईच्छा पुर्ण देखील झाली. एक वायुसेनेचे पायलट पद भुषवतांना त्यांनी स्वप्नातदेखील विचार केला नव्हता की त्यांचा प्रवास भारतीय वायुसेना ते थेट अंतरीक्षापर्यंत पोहोचेल. त्यांच्या एकुण प्रवासाबद्दल बोलतांना ते म्हणाले होते. “लहानपणापासुन मी पायलट बनण्याचे स्वप्न पाहीले होते आणि जेव्हां मी पायलट बनलो तेव्हां वाटले आपले स्वप्न पुर्ण झाले. नॅशनल डिफेन्स अकादमी म्हणजेच एनडीएमध्ये त्यांना १९६६ साली प्रवेश मिळाला. राष्ट्रीय सुरक्षा अकॅडमी एन डि ए मधून पास झाल्यानंतर, १९७० मध्ये ते भारतीय वायू दलामध्ये टेस्ट पायलट पदावर ते रुजू झाले.एक टेस्ट पायलट असल्या कारणाने पाकिस्तान विरोधातील युद्धामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

“त्यांचे अथक परिश्रम आणि मेहनत यांच्या बळावरच त्यांनी 8 दिवसांचा अंतरीक्षातील प्रवास पुर्ण केला आणि जगाला दाखवुन दिले की मनापासुन जर स्वप्नं पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही.राकेश शर्मा जन्म : १३ जानेवारी १९४९ हे अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय. भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी. भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-११ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.

२० सप्टेंबर १९८२ रोजी इस्रो आणि सोव्हिएत इंटर कॉसमॉस स्पेस प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या अवकाश मोहिमेमध्ये अवकाशयात्री म्हणून राकेश शर्मा यांची निवड करण्यात आली.२ एप्रिल १९८४ रोजी राकेश शर्मा यांनी Soyuz T-11 मोहिमे अंतर्गत अवकाशयानामधून Salyut 7 स्पेस स्टेशनच्या दिशेने अंतराळात झेप घेतली आणि ते भारताचे पहिले अंतराळवीर ठरले.ते जवळपास २१ तास आणि ४० मिनिटे अंतराळात वावरले. राकेश शर्मा यांच्या बरोबरीने युरी मालिशेव आणि गेनाडी स्ट्रेकलोव्ह हे दोघे होते.या मोहिमेत राकेश शर्मा यांची भूमिका होती शास्त्रीय आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास करणे. ज्यात बायो मेडिसिन आणि रिमोट सेन्सिंग या दोन विषयावर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले.या अवकाश संशोधनामुळे भारताचे या क्षेत्रात फार मोठे नाव झाले आहे.

अंतराळात असताना सर्व मोहीमवीरांनी थेट अंतराळातून रशियाचे अधिकारी आणि भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी टेलिव्हिजन न्यूज कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता.या वेळेस इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मांना प्रश्न विचारला की अंतराळातून आपला भारत कसा दिसतो? तेव्हा राकेश शर्मा म्हणाले,सारे जहॉं से अच्छा! त्यांचे हे उत्तर ऐकून समस्त भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. त्यांना देशाचा किती अभिमान वाटतो, हे त्यांच्या कृतीतून दिसून आले आहे.

मोहिमेवरून परत आल्यावर राकेश शर्मा यांना सोव्हिएत युनियनचे हिरो म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच भारत सरकारने देखील अशोक चक्र देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.राकेश शर्मा या भारतीयानं जशी अवकाशात झेप घेतली तसा त्यांनी आपलं नाव इतिहासाच्या पानावर कोरलं होतं. अवकाशाची यात्रा करणारे ते पहीले भारतीय ठरले होते. 8 दिवस अंतरीक्षात राहिल्यानंतर 11 एप्रील ला कजाकीस्तान इथं त्यांनी लॅण्ड केलं होतं. प्रत्येक भारतीयाकरता ते आज प्रेरणास्त्रोत ठरले आहेत.

भारतीय वायुसेनेत टेस्ट पायलट च्या रूपात दाखल झाल्यानंतर 1971 पासुन त्यांनी एयरक्राफ्टव्दारे उड्डाण केले. त्यांचे कौशल्य पाहाता 1984 मध्ये त्यांना भारतीय वायुसेनेच्या स्कवार्डन लीडर आणि पायलट पदावर नियुक्त करण्यात आले. 12 सप्टेंबर 1982 ला सोवियत इंटेरकॉस्मोस स्पेस प्रोग्राम आणि इसरो (इंडियन स्पेस रिसर्च आर्गेनाईजेशन) यांच्या वतीनं ते अंतरीक्षात जाणा-या सुमहातील सदस्य बनले.

अंतरीक्षातुन परत आल्यानंतर त्यांना हीरो ऑफ सोवियत संघ या पदाने सन्मानित करण्यात आले. भारत सरकारनेही त्यांना आपल्या सर्वोच्च पुरस्कार अशोक चक्राने सन्मानित केले होते.भारता करता राकेश शर्मा कोहिनुर हि-यापेक्षा कमी नाहीत भारतीय त्यांच्या अतुल्य योगदानाला नेहमी स्मरणात ठेवतील त्यांच्या या कामगिरीला सलाम.

संकलन : आदिल रियाझ शेख मो ७६६६६०२६६०