अहमदनगर (दि १२ जानेवारी २०२१)प्रतिनिधी – अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक व पत्रकार मधुकरराव खेडकर यांचे आज सकाळी 11 वाजता पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. गेले अनेक महिने ते उपचारासाठी मुलगी दीपा आणि जावई डॉक्टर गुजर यांच्याकडे होते. सुारे 30 वर्ष जिल्हा सहकारी बँकेचे ते कर्मचारी संचालक आणि अधिकारी होते. इंडियन एक्स्प्रेसचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी 20 वर्षे काम केले. महाराष्ट्र शासनाचा इंग्रजी पत्रकारितेसाठी असलेला विकास पत्रकारितेचा पुरस्कार सलग 7 वर्षे मिळवणारे ते एकमेव पत्रकार होते. प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष आणि नगर व्यासपीठच्या स्थापनेपासून ते उपाध्यक्ष होते.त्यांच्या पश्‍चात पत्नी,मुलगी दीपा, जावई डॉक्टर गुजर आणि नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.