जिजाऊ जयंती निमित्त काँग्रेसच्या वतीने अभिवादन

अहमदनगर (दि १२ जानेवारी २०२१) : समाजामध्ये अनागोंदी माजलेली असताना जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष घडविला. जिजाऊंच्या शिकवणीमुळेच शिवाजी महाराज रयतेचे राजे होऊ शकले, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.जिजाऊ जयंतीनिमित्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अहमदनगर वस्तुसंग्रहालयातील जिजाऊंच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. यावेळी काळे यांच्यासह खलील सय्यद,अनंतराव गारदे, फारुखभाई शेख, अनिसभाई चुडीवाल, नाथा अल्हाट, चिरंजीव गाढवे, सुजित जगताप, ॲड.अक्षय कुलट, नलिनीताई गायकवाड, उषाकिरण चव्हाण, सुनीता बागडे, नीता बर्वे, कौसर खान, उषाताई भगत, जरीना पठाण, प्रमोद अबुज, अमित भांड, प्रवीण गीते, सिद्धेश्वर झेंडे, दानिश शेख, अज्जूभाई शेख, प्रसाद शिंदे, प्रशांत वाघ, ॲड.चेतन रोहोकले आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विद्यार्थी काँग्रेसचा सुसंस्कृत युवा घडविण्याचा संकल्प

जिजाऊ जयंतीनिमित्त विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने विद्यार्थीचे शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे, सुजित जगताप यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, युवकांनी मोठ्या संख्येने एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या एसटी स्टँड येथील पुतळ्याला हार घालून शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला. यामुळे परिसर दणाणून गेला होता. यानंतर शांततेच्या मार्गाने विद्यार्थी, युवक जिजाऊ पुतळ्याच्या ठिकाणी एकत्र जमले. यावेळी बोलताना चिरंजीव गाढवे म्हणाले की, जिजामातांनी शिवाजी महाराजांना वैचारिक शिकवण दिली. जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नगर शहरामध्ये विद्यार्थी, युवक यांचे संघटन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मजबूत करत असताना जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शहरात सुसंस्कृत युवापिढी निर्माण करण्याचा संकल्प जिजाऊ जयंती निमित्त केला आहे. सुजित जगताप म्हणाले की, विद्यार्थी, युवक हे देशाचे भविष्य आहेत. शहरातील राजकारणाचे झालेले गुन्हेगारीकरण हे किळसवाणे असून आम्ही विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून सदमार्गाने जाणारे, शहराबद्दल आत्मीयता असणारे, तसेच उद्योजकता, स्वयंरोजगार त्याचबरोबर युवकांसाठी रोजगार निर्मितीसाठी धडपडणारे युवा घडवण्याचा व्यापक विचाराने प्रेरित होवून काम करीत आहोत. या मोहिमेत ना. बाळासाहेब थोरात, आ. सुधीर तांबे, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तरुण निश्चित यशस्वी होऊ असा विश्वास गाढवे, जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.