करोनाच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग हळूहळू पसरत असल्याचं दिसत आहे. ब्रिटनहून आलेल्या २० प्रवाशांमध्ये आतापर्यंत करोनाचा नवा स्ट्रेन आढळून आलेला आहे. यामध्ये देशातील विविध भागांमध्ये मागील काही दिवसांमध्ये आढळलेल्या सहा जणांचा समावेश आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मिळालेली आहे.

सध्या ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनने हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं तातडीने ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर घातलेली बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

कोलकात्तामध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रकार समोर आला आहे. ब्रिटनहून आलेल्या एका व्यक्तीमध्ये या नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळली आहेत. ज्याला आता क्वारंटाईन करण्यात आले आहे.