मुंबई : एकदा एका विचित्र राजकीय परिस्थितीत माझे बोलण अहमद भाई पटेलांशी झाले होते.त्यावेळी त्यांनी विेशास दिला की उद्धवजी चिंता मत करो, त्यानंतर मात्र त्यांनी सांगितले तसेच झाले. महाविकास आघाडीच कसे जुळणार असे वाटत असताना, त्यांचा फोन आला आणि काम झाले, अशी आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितली. खर्या अर्थाने काँग्रेसमधील चाणक्य गेला अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना काल विधानसभेत शोक प्रस्तावाच्या वेळी व्यक्त केल्या. सत्तेत आल्यापासून काही अनपेक्षित धक्के होते, त्यापैकीच एक म्हणजे काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचे अचानक मृत्यू होणे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. अहमदभाई पटेल यांचा सहवास अनेकांना लाभला. त्यांना एपी नावाने ओळखले जायचे. एपीच्या घरी जायचा योग अनेकांना आला. त्यांच्या निधनाच्या 8 दिवस आधी आमच्या दोघांची हॉस्पिटलमध्ये भेट झाली होती. त्यांना भेटायला गेल्यावर ते उठून बसले. आम्ही सुरक्षित अंतरावर बसून जवळपास अर्धा तास गप्पा मारल्या. पण नियतीला काहीतरी वेगळच मान्य होते. त्यांची अवघ्या आठ दिवसात तब्येत खालावली आणि कोणालाही वाटलही नव्हते इतक्या अल्पावधीतच त्यांचे निधन झाले, अशी आठवण सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी राज्यातल्या नेत्यांना सोनिया गांधी यांच्याकडे बोलावून घेतले. आम्हाला एपींचा निरोप आल्यानंतर आम्ही राज्यातले नेते दिल्लीला गेलो. सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत दिल्लीला सखोल चर्चा झाली. अध्यक्षांचा आदेश मानून त्यांनी ते प्रामाणिकपणे राबवले. महाविकास आघाडीची मोट बांधण्याचे काम हाती घेतले आणि मार्गी लावले. पक्षातील व्यक्तिगत संबंध तर चांगले होतेच, पण इतर पक्षातही त्यांचे संबंध चांगले होते. रात्री अडीच तीन वाजेपर्यंत काम करायचे आणि जेवण रात्री 2 वाजता करायचे. कोणतीही सामाजिक संघटना असो प्रत्येक राज्यातील कार्यकर्त्यांची बारकाईने माहिती त्यांच्याकडे असायची. एकूणच राजनैतिक क्षेत्रातले त्यांचे योगदान मोठे होते,असे मत त्यांनी यावेळी मांडले. महाविकास आघाडी सरकारची सुत्रे सांभाळल्यानंतर कसं सुरू आहे हे विचारण्यासाठी अनेकदा अहमदभाई पटेल यांचा फोन यायचा. एकदा मी रात्री 11.30 वाजता घरी पोहचल्यावर फोन आला की, अहमदभाई पटेल यांचा फोन येऊन गेला आहे. रात्री 12.15 वाजता खूप हिंमत करून फोन केला, यावेळी जागे असतील का हा विचार करून फोन केल्यावर त्यांच्या मुलीने फोन उचलला आणि सांगितले की अहमदभाई आता झोपले आहेत. तुम्ही रात्री अडीच वाजता फोन करा, तेव्हा ते एका अपॉइंटमेंटसाठी उठणार आहेत. राजकारणात अशी माणसे ही शोधून सापडणार नाहीत, अशी आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या श्रद्धांजली सभेत सांगितली.