अहमदनगर (दि १२ डिसेंबर २०२०) : महाराष्ट्रात भाजपाची सत्ता नसतानाही व कुठल्याही मोठ्या पदावर नसतानाही स्व.गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाचे स्टार प्रचारक म्हणून मोठी ख्याती मिळविली. ऊसतोडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी आयुष्यभर लढा दिला. आठरापगड जातींना एकत्र करुन न्याय देण्याचेही काम त्यांनी केले आहे. आज सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांनी दाखविलेल्या मार्गावर जाऊन त्यांच्या विचारानेच काम करत आहेत.  आज केंद्रात भाजपाची सत्ता आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये असताना स्व. गोपीनाथ मुंडे यांनी सर्वसामान्यांनासाठी राबविलेल्या विविध योजनांद्वारे आज मोठा आधार ठरत आहे. या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणचे काम आपण सर्वांना करावयाचे आहे. स्व.गोपीनाथ मुंडे यांची तळगाळातील लोकांसाठी केलेले कार्य आपण यापुढेही पक्षाच्या माध्यमातून सुरु ठेवू, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.

भारतीय जनता पार्टी नगर शहर शाखेच्यावतीने स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गांधी मैदान येथील भाजपा कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, प्रदेश सदस्य अ‍ॅड.अभय आगरकर, सुनिल रामदासी, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस महेश नामदे, वसंत राठोड, सचिन पारखी, अजय चितळे, महेश तवले, तुषार पोटे, बाळासाहेब गायकवाड, ज्ञानेश्‍वर धिरडे, अर्जुन लाड, किशोर कटोरे, ऋग्वेद गंधे, सिद्धार्थ नाकाडे, राहुल कवडे, शिवाजी दहिंडे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी अभय आगरकर म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या सुरुवातीच्या काळापासून स्व.गोपीनाथ मुंडे यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. पक्षाची ध्येये-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या अपार मेहनतीमुळेच राज्यातही आणि देशातही भाजपाची सत्ता आली होती. महाराष्ट्रातील गाव पातळीपासून मेट्रो सिटीपर्यंत त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली. एक अभ्यासू वक्ता, कुशल नेतृत्व हे भाजपाला लाभले होते. त्यांचा झंझावत व तळागाळातील लोकांसाठी केलेले कार्य कोणीही विसरु शकत नाही, असे सांगून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

याप्रसंगी सुनिल रामदासी, सचिन पारखी, अनिल गट्टाणी, तुषार पोटे आदिंनी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याविषयी माहिती देऊन त्यांच्या नगरमधील आठवणींना उजाळ दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश नामदे यांनी केले तर आभार तुषार पोटे यांनी मानले. यावेळी कैलास गर्जे, नितीन शेलार, अनिल सबलोक, पंकज जहागिरदार, नरेश चव्हाण, सुजित खरमाळे, साहिल शेख, आदेश गायकवाड, लक्ष्मीकांत तिवारी, अनिल गट्टाणी, सुधीर मंगलाराप्, राम वडागळे, अमोल निस्ताने, चंद्रकांत पाटोळे, सुमित बटूळे, सुबोध रसाळ, शैलेंद्र ओहोळ, आशिष अनेचा, किरण जाधव, हुजेफा शेख, प्रणव सरनाईक आदि उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक एल.जी.गायकवाड यांना भाजपच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.