सहावी पुण्यतिथी निमित्ताने काही आठवणी सन१९८० जनता पार्टीचे सरकार जावुन पुन्हा कॉंग्रेस चे सरकार सत्तेवर आले.तदनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदी बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांची निवड झाली.अन महाराष्ट्रात आधुनिकतेची क्रांती आली, कॉंग्रेस आयचे संस्थापक सदस्य होते.त्यावेळी महाराष्ट्रात आय कॉंग्रेसला प्रेमानं आई कॉंग्रेस म्हणत होते. बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांनी आपल्या १९महिण्याच्या कारकिर्दीत अनेक धडाडीचे निर्णय घेतले,ते सर्व जनतेच्या हिताचे होते.त्यांना गोरगरीब जनतेबद्दल खुपच आपुलकी होती.त्यांनी गोरगरीब विधवा महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना  व संजय गांधी स्वावलंब योजना सुरू केली.

पुणे महसुल आयुक्तांवर होणारे भार कमी करून त्यांनी नवीन नाशिक महसूल आयुक्त विभाग बनविले.त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यला विशेष संगमनेर ला खुप फायदा झाला.लातुर, रायगड,सिंधूदुर्ग या जिल्ह्यांची निर्मिती त्यांनी केली.त्यावेळी अहमदनगर जिल्ह्याचा विभाजन करुन नवीन संगमनेर जिल्हा जवळपास निश्चित झालं होतं मात्र राजकारण…तसेच नवीमुंबई ची निर्मिती मुंबई ला बोरीवली नॅशनल पार्कचे संजय गांधी नॅशनल पार्क नामकरण इत्यादी.

त्यांना शिवसेना प्रमुख आदरनीय बाळासाहेब ठाकरे म्हणत होते की,”एवढा देखणा एवढा डॅशिंग आणि खडबड उडवून देणारा” मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्राने पाहिला नाही. महाराष्ट्र कर्नाटक सिमा प्रश्ना बाबत शिवसेना प्रमुख आदरनीय बाळासाहेब ठाकरे त्यांना हमखास म्हणायचे कि अंतुले साहेबांनी पुन्हा आपला काळा कोट घालून कोर्टात महाराष्ट्रासाठी लढावं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विशेष आपुलकी होती.बॅ.ए.आर.अंतुले आपल्या धडाडीचे कार्याबद्दल नेहमी स्मर्णात राहतील.             

 संकलन     शेख मो.ईदरीस मो.शफी.