नाशिक (२२ नोव्हेंबर २०२०) : नाशिकमध्ये ४ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अशी घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत रविवारी सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली.पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले मुंबई व पुणे जिल्ह्यात शाळा सुरू न करण्याचा निर्णय झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱयांसोबत आज चर्चा केली. त्यावर ४ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २३ नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ शाळा सुरू होणार होत्या त्याचदरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावी अनुदानित व विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी केल्या शिवाय शाळेत नो एन्ट्री असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.