अहमदनगर (दि २१ नोव्हेंबर २०२०) : कोरोना विषाणू हा संसर्ग विषाणू असल्यामुळे तो नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात फैलावत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असताना नागरिकांना धीर देण्याचे काम आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरामध्ये गेली 6 ते 7 महिने सातत्याने करित आहे. नागरिकांमधील कोरोना आजारा संदर्भातील भिती दूर करण्याचे काम त्यांनी केले कोरोनाच्या काळामध्ये विविध गरीब कुटुंबाचा रोजगार गेला होता. त्यांना अन्नधान्याच्या रूपाने मदत करण्याचे काम केले आहे.

विविध हॉस्पीटलमध्ये रूग्णांना दाखल करण्यापासून ते त्यांना औषधे मिळून देण्यापर्यत त्यांनी काम करित आहे. त्यांनी नगर शहरातील गरजू कोरोनाच्या गंभीर रूग्णांना रेमडेसिव्हीअर इंजेक्शन मोफत मिळून देण्याचे काम त्यांनी केले. अनेक रूग्णांना त्यांनी ख-या अर्थाने जिवदान देण्याचे काम केले आहे. त्यांच्या कामाचा गौरव करणे हे आमचे कर्तव्य आहे. म्हणून पुणे येथील अश्‍वमेध युवा मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आला असे प्रतिपादन संस्थेचे सस्थापक अध्यक्ष गणेश कवडे यांनी केले आहे.

कोरोनाच्या काळामध्ये आमदार संग्राम जगताप यांचे उल्लेखनिय काम.केल्या बद्दल पुणे येथील अश्‍वमेध युवा मंच महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने प्रमाणपत्र प्रदान करताना गणेश कवडे, चाकण नगरपरिषदेचे उपनगराध्य विजय मुटके, अक्षय भोर, भुरूक, भुषण गुंड, संतोष ढाकणे,वैभव ढाकणे, मोहन गुंजाळ, विजू सुबे, सागर शिंदे, राहुल ठोंबरे अक्षय डाके आदी उपस्थित होते.

यावेळी आ. जगताप म्हणाले की, नगर शहरातील जनतेने माझ्या कामावर विश्‍वास टाकून मला महापौर व आमदारकी पदाची संधी दिली या संधीच्या माध्यमातून समाजाची सेवा करणे हे माझे कर्तव्य समजतो या माध्यमातून मी काम करित आहे. विकास कामाबरोबरच सामाजिक बांधीलकी जोपासने गरजेचे आहे. कोरोनाचा काळ हा मनुष्य जीवनाला वेदना देणारा काळ ठरला आहे. या काळात प्रत्येकाला आधार देणे हे माझे कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून मी कोरोनाच्या काळात काम करित आहे असे ते म्हणाले.