अहमदनगर (शिर्डी दि २० नोव्हेंबर २०२०) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास मंत्राने संपूर्ण देशाचा विेशास संपादन केला आहे. बिहार निवडणुकीच्या यशानंतर सर्वाची जबाबदारी वाढली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेवून आत्मनिर्भर योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यत पोहचवा.

राज्यात लवकरच सत्ता येईल. शिर्डी नगरपंचायतीवरही भाजपचाच झेंडा फडकविण्यासाठी कटीबध्द व्हा, असा संदेश भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.शिर्डी शहरातील भाजपच्या नूतन पदाधिकार्‍यांना नियक्ती पत्र आ.विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहर अध्यक्ष ज्ञानेेशर गोंदकर,पक्षाच्या उद्योग आघाडीच्या उतर महाराष्ट्राचे प्रमुख शिवाजीराव गोंदकर शहराचे अध्यक्ष सचिन शिंदे उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आ.विखे पाटील म्हणाले, की बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विेशास व्यक्त करणारे आहे. इतर राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीतून जनतेचे पाठबळ भाजपाच्या पाठीशी असल्याचे सिध्द झाले आहे. जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे आपण पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्याने प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विेशासघात केला आहे.

अनेक महीने घरात बसलेले मुख्यमंत्री राज्याने कधी पाहीले नव्हते. शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.समाजातील कोणत्याच घटकांना आघाडी सरकार दिलासा देवू शकले नाही. महाविकास आघाडी सरकारचे अपयश जनतेला सांगावे लागेल.आगामी काळात नगरपंचायतीची असलेली निवडणुक लक्षात घेवून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नियोजन सुरू करावे.थोड्याच दिवसात राज्यात सत्ता येईल आणि नगरपंचायतीवरही भाजपा झेंडा फडकेल असे सुतोवाचही आ.विखे यांनी केले.